Join us

बापरे बाप ! या Urfi Javedला झालंय तरी काय, म्हणतेय माणसाच्या चामडीपासून बनवणार नवा ड्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:45 IST

Urfi Javed : उर्फी जावेद पुन्हा एकदा नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

उर्फी जावेद (Urfi Javed) ही एक अतिशय बोल्ड अभिनेत्री आहे जी तिच्या कामासाठी तसेच तिचे बोल्ड कपडे, असामान्य फॅशन सेन्स आणि स्पष्टवक्ते विधाने आणि मुलाखतींसाठी ओळखली जाते. उर्फी जावेदचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून  सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, आगामी काळात तिचा ड्रेस कोणत्या मटेरियलमधून बनवला जाईल. उर्फी पुढे जाऊन मानवी त्वचेपासून स्वतःचा ड्रेस बनवू शकते! 

उर्फी आज एका कॅफेच्या बाहेर दिसली जिथे अभिनेत्रीने काय परिधान केले होते ते खूपच विचित्र होते. त्यावेळी तिला पापाराझीने विचारले की तिने शक्य असलेल्या सर्व गोष्टींमधून ड्रेस बनवला आहे आणि आता तिचा पुढचा ड्रेस मानवी त्वचेचा असेल का? यावर हो असे उत्तर देताना अभिनेत्रीने धक्कादायक विधान केले आहे.

जेव्हा उर्फीला विचारण्यात आले की तिचा पुढचा ड्रेस मानवी त्वचेपासून बनवला जाईल, तेव्हा हो असे उत्तर देताना अभिनेत्रीने मीडियामध्ये उभ्या असलेल्या एका मुलाला सांगितले की, ती एखाद्याला मारून नंतर त्याच्या त्वचेपासून ड्रेस बनवण्याची शक्यता आहे. पुढे, उर्फी त्या मुलाला सांगते की मी तुला मारून टाकेन आणि जर अशी गरज पडली तर मला माणसाच्या त्वचेपासून माझा पोशाख तयार करावा लागेल.

उर्फीने असेही सांगितले की शेवटच्या क्षणी तिचा ड्रेस फाटल्याने तिने जीन्स बाजूने कापली आणि टॉप म्हणून घातला. उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र आठव्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
टॅग्स :उर्फी जावेद