Join us

​पिहू कोणता निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 12:10 IST

ये है मोहोब्बते या मालिकेत पिहूचा सांभाळ आता शगुन करणार आहे. न्यायालयाने पिहूचा ताबा शगुनकडे दिल्यानंतर सगळ्यांनाच प्रचंड धक्का ...

ये है मोहोब्बते या मालिकेत पिहूचा सांभाळ आता शगुन करणार आहे. न्यायालयाने पिहूचा ताबा शगुनकडे दिल्यानंतर सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला आहे. भल्ला कुटुंबासोबत पिहूचा हा वाढदिवस शेवटचा असल्याने त्यांनी तो मोठ्या उत्साहात साजरा करायचे ठरवले आहे. त्यांनी सगळ्यांनी पिहूला आवडणाऱ्या कार्टून्सची वेशभूषा केली आहे. भल्ला कुटुंबांने पिहूच्या आनंदासाठी इतकी मेहनत घेतल्याने पिहूदेखील खूश होणार आहे. पण या वाढदिवसाच्या पार्टीनंतर ती संभ्रमात पडणार आहे. भल्ला कुटुंबासोबत राहायचे की शगुनसोबत जायचे हा प्रश्न तिला पडणार आहे. आता पिहू कोणता निर्णय घेते हे आपल्याला लवकरच कळेल.