Join us

WHAT ! 'चला हवा येऊ द्या'मधून श्रेया बुगडेने घेतला ब्रेक? जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 12:14 IST

चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे श्रेया बुगडे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. अप्रतिम कॉमेडी टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेया महाराष्ट्राला खळखळून हसवते.

'चला हवा येऊ द्या' या शोमधील कलाकार आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढून फॅमिली फ्रेण्डसोबत वेळ घालवत असतात. कुशल अनेकदा फॅमिलीसोबत पिकनीकवर जाताना दिसतो. तर भाऊसुद्धा आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवताना दिसतात. नुकतीच त्यांनी आपल्या कुटूंबियांसोबत कर्नाळाला पक्षी अभयारण्याला भेट दिली आणि अलिबागला सुद्धा ते फॅमिली पिकनीकला गेले होते. यासोबतच अभिनेत्री श्रेया बुगडे सुद्धा आपल्या मित्र मैत्रीण तसेच पतीसोबत वेळ घालवताना दिसते. ती तिचे फोटो तसेच व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करते. नुकतीच ती आपल्या मित्र परिवारासोबत फिरायला गेलीये. तुम्हाला वाटेल याचा अर्थ तीने चला हवा येऊ द्यामध्ये काही दिवस दिसणार नाही. तर तसे नाही. श्रेयाने ब्रेक घेतलेला नाही. तिनं तिचे शुटिंग आधीच केलेले आहे. त्यामुळे ती चला हवा येऊ द्या च्या तसेच किचन कलाकार या दोन्हींच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. पण ती सध्या कुठे गेलीये हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उस्तुक असाल ना. तर सध्या ती दुबईवारी करतेय...यावेळी तिनं Al Seef Street ला वर शॉपिंग केली. 

श्रेया ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच एक्टिव्ह असते. ती तिचे  ट्रॅव्हलिंग फोटो तसेच वेगवेगळ्या टूरचे फोटो शेअर करत असते.छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमधून अभिनेत्री श्रेयाने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली.

अप्रतिम कॉमेडी टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेया महाराष्ट्राला खळखळून हसवते. श्रेया मुळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली.

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या