Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्वशी ढोलकियाच्या या फोटोमागचं गुपित काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 13:38 IST

'चंद्रकांता' या मालिकेत  उर्वशी राणी इरावतीची भूमिका साकारत आहे.यापूर्वी उर्वशीने 'कसौटी जिंदगी की' मालिकेत  कोमोलिका ही भूमिका साकारली होती. ...

'चंद्रकांता' या मालिकेत  उर्वशी राणी इरावतीची भूमिका साकारत आहे.यापूर्वी उर्वशीने 'कसौटी जिंदगी की' मालिकेत  कोमोलिका ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला निगेटिव्ह शेड्स होत्या. त्यावेळी उर्वशीने साकारलेली कोमोलिका ही भूमिका प्रचंड गाजली होती.त्यामुळे तिला तिच्या पेक्षा कोमोलिका याच नावाने जास्त ओळखले जायचे.आता चंद्रकांता मालिकेतही कोमोलिकाप्रमाणेच उर्वशी साकारत असलेल्या राणी इरावतीच्या भूमिकेलाही निगेटिव्ह शेड्स आहेत. उर्वशी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.ती शूटिंगमधून जसा वेळ मिळेल तसा तिचे वेगवेगळे अंदाजातील सेल्फी क्लिक करत इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा उर्वशीने एक स्विट सेल्फी क्लिक करत तिच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोला तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.या फोटोला तिचे चाहते अनेक लाइक्स आणि कमेंटस देताना दिसतायेत. पुन्हा एकदा कोमोलिकाचा तोच औरा चंद्राकांताच्या माध्यमातून पाहायला मिळत असल्याचे तिचे चाहते तिला प्रतिक्रीया देताना दिसतायेत. त्यामुळे उर्वशीला पुन्हा एकदा तिने कमावलेली लोकप्रियता अनुभवता येत असल्याचे सांगितले आहे. आजही रसिक कोमोलिका ही भूमिका विसरलेले नाहीत. मला पाहताच रसिक कोमोलिकाचा शोध घेत असल्याचे जाणवते त्यामुळे चंद्रकांताच्या निमित्ताने रानी इरावती साकारत असताना कोमोलिकाची आठवण होतेच त्यामुळे ती भूमिका सदैव मनात घर करून राहणार असल्याचेही उर्वशीने सांगितले. ऑनस्क्रीन उर्वशी साकारत असलेली ही राणी इरावती चालाख आणि सत्तेची भुकेली आहे.या भूमिकेला साजेशा लूक मालिकेच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो.आकर्षक ड्रेसिंग स्टाईल असली तरी तिची नजर कपटी असल्याचं तिच्या लूकमध्ये पाहायला मिळतंय.आता रिअल लाईफमध्येही क्लिक केलेल्या या फोटोतही उर्वशीच्या मनात जणू काही तरी नवा कट शिजत असल्याचं या फोटोकडे पाहून समजतंय.त्यामुळे आगामी काळात ऑनस्क्रीन भूमिका रंजक वळण घेणार असेच हा फोटो सुचना तर देत नाहीय ना अशा पध्दतीने क्लिक केलेला हा फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.