Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत ऋषी देव घेणार रोहन मेहराची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 16:28 IST

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेला हिना खान, करण मेहराने नुकताच रामराम ठोकला. आता करण मेहराची जागा मालिकेत ...

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेला हिना खान, करण मेहराने नुकताच रामराम ठोकला. आता करण मेहराची जागा मालिकेत विशाल सिंगने घेतली आहे. या दोघांप्रमाणे या मालिकेत नैतिक आणि अक्षराच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या रोहन मेहरानेदेखील ही मालिका सोडली आहे. सध्या रोहन बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहनने मालिका सोडल्यामुळे नक्ष ट्रेकिंगला गेल्याचे दाखवण्यात आले आहे. पण आता तो घरी परतणार आहे.   रोहनची जागा कित्येक दिवस मालिकेत कोणीच घेतली नव्हती. पण आता रोहनच्या ऐवजी या मालिकेत ऋषी देव दिसणार आहे. रोहनने ही मालिका सोडल्याचा ऋषीला फायदा झाला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण ऋषीला या मालिकेद्वारे एक चांगला ब्रेक मिळाला आहे. ऋषीने यापूर्वी बालिकावधू, बानी-इश्क दा कलमा यांसारख्या मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत लवकरच सहा महिन्यांचा लीप घेतला जाणार आहे. लीपनंतर नैरा आणि कार्तिकच्या साखरपुड्याची तयारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत एंट्री करण्यासाठी ऋषी खूपच उत्सुक आहे. ऋषी सांगतो, "ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यामुळे इतक्या प्रसिद्ध मालिकेचा मला भाग व्हायला मिळतेय त्याचा मला खूप आनंद झाला आहे. नक्ष ही व्यक्तिरेखा लोेकांमध्ये खूप लाडकी आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेला मी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. प्रेक्षक माझ्या या व्यक्तिरेखेवरदेखील प्रेम करतील याचा मला विश्वास आहे."