Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ये प्यार नहीं तो क्या है’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 10:32 IST

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि एक दूजे के वास्तेचे निर्माते, बिंदू मूव्हिंग इमेजिसचे सुप्रसिद्ध  लेखक व निर्माता दिलीप झा लवकरच ...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि एक दूजे के वास्तेचे निर्माते, बिंदू मूव्हिंग इमेजिसचे सुप्रसिद्ध  लेखक व निर्माता दिलीप झा लवकरच घेऊन येत आहेत, एक टवटवीत आणि आगळी-वेगळी, आधुनिक काळातील प्रेम कहाणी ‘ये प्यार नहीं तो क्या है’. आजच्या दिल्लीची पार्श्वभूमी लाभलेल्या या मालिकेचा बहुतांशी भाग एका खर्‍याखुर्‍या हवेलीत आणि दिल्ली व नॉइडाच्या आसपासच्या विशिष्ट स्थळी चित्रित करण्यात आला आहे. यात उच्च मध्यम वर्गाच्या जीवनशैलीचे व संस्कृतीचे चित्रण आहे व प्रेक्षकांसाठी ही एक नयनरम्य मेजवानी असणार आहे. या मालिकेसाठी नमित खन्ना यास मुख्य पुरुष क्तिरेखेसाठी म्हणजे सिद्धान्त सिन्हाची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आले आहे. मॉडेलिंगच्या विश्वातील हे सुपरिचित नाव असून त्याने सव्यसाची व इतर मोठ्या ब्राण्ड्ससाठी काम केले आहे. वेब सिरीजमधील त्याची भूमिका देखील वाखाणण्यात आली आहे. पलक जैन ही अनुष्का रेड्डी या मुख्य स्त्री व्यक्तिरेखेच्या रूपात पदार्पण करत आहे. टेलिव्हिजन उद्योगातील मोठमोठे कलाकार या मालिकेचे अभिन्न अंग असणार आहेत. ज्यांमध्ये समावेश आहे, मनीष चौधरी, अल्का अमीन, अनुराग अरोरा आणि इतरांचा.  
ही एका उदयोन्मुख वकिलाची गोष्ट आहे, जो सतत यशाच्या शोधात आहे. यशस्वी होऊन देखील यशाची दुसरी शिखरे सर करण्याची उमेद त्याच्यात जिवंत असते. यातील गोष्ट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल, सनसनाटी निर्माण करेल आणि या विषयावर विचार करायला लावेल की, आधुनिक युगाच्या जोडप्यासाठी इतर गोष्टींमध्ये प्रेमाचे महत्त्व किती आहे? जर तुमचा जोडीदार तुमच्या सोबत नसेल तर तुम्ही मिळवलेले यश आणि भौतिक सिद्धी यांचे काहीही मूल्य नाही.