Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ये प्यार नहीं तो क्या है’ फेम मनीष चौधरी बनला स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 16:09 IST

सोनी टीव्हीवरील ये प्यार नहीं तो क्या है मालिकेत नमित खन्ना, पलक जैन, मनीष चौधरी, अंकित राज आणि इतर ...

सोनी टीव्हीवरील ये प्यार नहीं तो क्या है मालिकेत नमित खन्ना, पलक जैन, मनीष चौधरी, अंकित राज आणि इतर नामवंत कलाकार आहेत. प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. ‘हैदर’ सारख्या चित्रपटासाठी डिझाइन आणि स्टाइलची काम केलेला ख्यातनाम स्टायलिस्ट गुंजन अरोरा देखील या मालिकेसाठी काम करतो आहे. त्याने ‘चटनी’ आणि इतर लघुपटांसाठी देखील स्टायलिंगचे काम केलेले आहे.मालिकेतील पोशाख प्रेक्षकांना अस्सल आणि वास्तविक वाटावे यासाठी गुंजनला व्यक्तिरेखांचा बारकाईने अभ्यास करावा लागला आणि त्या प्रत्येकाची फॅशनची वैशिष्ट्ये ध्यानात ठेवावी लागली. याविषयी गुंजन सांगतो, “मनीष चौधरी हा सेटवरील सर्वाधिक स्टायलिश माणूस आहे. शिवाय के के रेड्डी ही त्याची व्यक्तिरेखा दक्षिण भारतीय, धनाढ्य उद्योगजकाची असल्यामुळे आणि ती एक सशक्त व्यक्तिरेखा असल्यामुळे त्याचे स्टायलिंग करण्यात आम्हाला खूप वाव आहे. त्या व्यक्तिरेखेत पारंपरिक आणि व्यावसायिक असे दोन्ही लुक आहेत. मनीषचे व्यक्तिमत्वच असे आहे की, कोणत्याही व्यक्तिरेखेसाठी तो अनुरूप दिसतो. मनीष चौधरी स्वतः उत्तर भारतीय असून तो या मालिकेत धनाढ्य दक्षिण भारतीय व्यावसायिकाची भूमिका उत्तमप्रकारे साकारत आहे.मनीष चौधरीला या मालिकेतील त्याच्या स्टाइलबद्दल विचारले असता तो सांगतो, “के के रेड्डीची भूमिका साकारायला खरंच खूप मजा येत आहे. त्याचा पोशाख आणि वेषभूषा खूप अस्सल आणि नवीन प्रकारची आहे. स्टायलिस्ट गुंजनने सगळ्याच व्यक्तिरेखांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केलेला आहे.”ये प्यार नहीं तो क्या है मालिकेतील डिझायनिंग आणि स्टायलिंगबद्दल पुढे तो सांगतो, “पलकचा साधा वाटणारा पण शालिन लुक, तरुण वर्गाचा लाडका नमित खन्ना याचा सर्वसामान्य लुक आणि मी स्वतः उत्तर भारतीय असून मालिकेतील माझा दक्षिण भारतीय लुक हे सर्वच उठून दिसावेत यासाठी टीमने खूप प्रयत्न केला आहे. माझ्या बाबतील बरेच लुक तपासण्यात आले आणि मग सर्वांना आवडलेला एक लुक आम्ही निवडला. माझ्यासाठी जी तरल रंगसंगती निवडण्यात आली आहे, आणि जे पोशाख निवडण्यात आले आहेत ते मला खूप आवडले आहेत. ही एक मिळून मिसळून काम करणारी टीम आहे आणि तुमच्या कल्पना फलकावर उतरविण्यास देखील ते वाव देतात.”Also Ready : ​ये उन दिनों की बात है या मालिकेच्या सेटवर रणदीप रायला मिळाली नवी मैत्रीण