Join us

प्राजक्ता माळीचा कोणता लूक तुम्हाला जास्त आवडला,कळवा आम्हाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 14:29 IST

मराठीमध्ये टीव्ही अभिनेत्रींमध्ये सगळ्यांत जास्त लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीकडे पाहिले जाते.'जुळुन येतील रेशीमगाठी' म्हणत प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली ...

मराठीमध्ये टीव्ही अभिनेत्रींमध्ये सगळ्यांत जास्त लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीकडे पाहिले जाते.'जुळुन येतील रेशीमगाठी' म्हणत प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती.या मालिकेनंतर प्रेक्षक पुन्हा प्राजक्ताला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक होते.त्यामुळेच 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' म्हणत तिने पुन्हा एकदा दणक्यात एंट्री घेतली आणि नकटी बनत हळुहळु प्राजक्तारने रसिकांना फुल ऑन एंटरटेन केलं.आतुरतेने प्राजक्ताची वाट पाहणा-या रसिकांसाठी 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' या मालिकेने प्रेक्षकांची प्राजक्ताला पुन्हा ऑनस्क्रीन पाहण्याची इच्छा पूर्ण केली.मालिकेत प्रजाक्ताने रंगवलेली 'नकटी'चा अंदाज रसिकांच्या पसंतीस पडत आहे.मालिकेतल्या तिच्या अभिनयामुळे तिच्या चाहत्यावर्गातही दिवसेंदिवस वाढ होत आहे.आपल्या प्रतिक्रीया थेट प्राजक्तापर्यंत पोहचाव्या म्हणून सोशल मीडिया हा एक उत्तम माध्यम.चाहते तिला फेबसबुक,इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी कनेक्ट होत तिला एक से बढकर एक भन्नाट प्रश्न विचारताना दिसतात.प्राजक्ताने फोटोशूट केलेले काही निवडक फोटोही मराठी अॅक्ट्रेस लिस्टसच्या टॉप सर्चमध्ये असून तिच्या प्रत्येक फोटोला चाहते कमेंटस,लाईक्स करताना दिसतात.ग्लॅमरस,ट्रेडिशनल अशा वेगवेगळ्या लूकमधले तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.तिच्या प्रत्येक फोटो हा चाहत्यांना घायाळ करणाराच आहे.इतकेच नाहीतर लग्नासाठी मुलींचे स्थळ शोधणारे मुंलही प्राजक्ता माळीप्रमाणे पत्नी मिळो अशी इच्छाही सर्रास बोलताना दिसतात.त्यामुळे ऑनलाईन काय आणि ऑफलाईन काय सगळीकडेच सध्या फक्त आणि फक्त प्राजक्ता माळीचाच बोलबाला चाहत्यांमध्ये पाहायला मिळतोय.तुर्तास तुम्हाला प्राजक्ताचा कोणता लूक जास्त आवडला त्याविषयी तुमचे मत नोंदवायला मात्र विसरू नका !