Join us
Daily Top 2Weekly Top 5

ये क्या हो गया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 18:01 IST

आरआरडी फिल्मस या नव्या प्रोडक्शन हाऊसची मालिका सुरू होणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. या मालिकेत श्रद्धा आर्या ...

आरआरडी फिल्मस या नव्या प्रोडक्शन हाऊसची मालिका सुरू होणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून येत आहेत. या मालिकेत श्रद्धा आर्या प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. या मालिकेत श्रद्धा वकिलाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार होती. पण ही मालिका कोणत्या वाहिनीवर दाखवली जाणार याबाबत सध्या प्रोडक्शन हाऊस आणि वाहिनींच्या मंडळींमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण सुरू व्हायला वेळ आहे. याच कारणामुळे श्रद्धाने ही मालिका सुरू व्हायच्या या मालिकेला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. पण या मालिकेसोबत माझ्या सदिच्छा असून या मालिकेने चांगली कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे असे ती सांगते.