हम मोटे हुए तो क्या हुआ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 11:45 IST
अभिनयक्षेत्रात असणारे कलाकार आपल्या फिटनेसचा नेहमीच विचार करतात. आपण सडपातळ दिसावे यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. पण याला ...
हम मोटे हुए तो क्या हुआ
अभिनयक्षेत्रात असणारे कलाकार आपल्या फिटनेसचा नेहमीच विचार करतात. आपण सडपातळ दिसावे यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. पण याला काही अपवाददेखील आहेत. कॉमेडियन भारती सिंगचे वजन खूपच जास्त आहे. पण हे वजन तिच्या यशाच्या मार्गात कधीच आलेले नाही. तिने कधीच आपण सडपातळ दिसावे असा कधीच विचार केलेला नाही. तिच्याचसारखेच मत इश्कबाज या मालिकेत काम करणाऱ्या नेहालक्ष्मी अय्यरचेही आहे. अभिनेत्री ही सडपातळ असावी ही गोष्टच नेहालक्ष्मीला पटत नाहीये. या मालिकेच्या निर्मात्यांनाही तिची ही गोष्ट आवडत असल्याने त्यांनी या भूमिकेसाठी तिची निवड केली.