Join us

​ये क्या हो रहा है

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 17:37 IST

मॉनी रॉय आणि मोहित रैना यांची भेट देवो के देव महादेव या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या ...

मॉनी रॉय आणि मोहित रैना यांची भेट देवो के देव महादेव या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. पण या दोघांनीही कधीही या आपल्या नात्याबद्दल बोलणे टाळले. या दोघांना नेहमीच एकत्र पाहिले जाते. मौनीचा नुकताच वाढदिवस झाला. तिने केवळ जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला मोहितही उपस्थित होता. एवढेच नव्हे तर केक कापनाही तो तिच्या बाजूलाच उभा होता. मोनीने आणि मोहितने केकही एकमेकांना भरवला. वाढदिवसाच्या पार्टीचा व्हिडिओ मोनीनेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केला आहे. त्यामुळे डाल में कुछ काला आहे या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे.