Join us

असे काय घडले विकता का उत्तरच्या मंचावर की, एका डॉक्टरनेच ट्रेडर्सना दिली टक्कर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 16:24 IST

'विकता का उत्तरच्या मंचा'वर अनेक नवीन गोष्टी घडत रसिकांना आश्चर्यचा धक्का देण्यात येतो. या मंचावर आलेल्या अनेक स्पर्धकांवर त्यांच्या ...

'विकता का उत्तरच्या मंचा'वर अनेक नवीन गोष्टी घडत रसिकांना आश्चर्यचा धक्का देण्यात येतो. या मंचावर आलेल्या अनेक स्पर्धकांवर त्यांच्या बौध्दीक कौशल्यामुळे कौतुकांचा वर्षाव झालाय.या मंचावर अनेक वेगवेगळ्या  गोष्टी घडतात त्यातच आता पहिल्यांदाच ट्रेडर्सना भाव करावे लागल्याचे पाहायला मिळणार आहे.  व्यवसायाने डॉक्टर असलेल्या वासिम महमूद पठाण यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक प्रश्नाची अचूक उत्तर देत,ट्रेडर्सना देखील अचंबित केले. विकता का उत्तरच्या सेटवर त्यांना विचारण्यात आलेल्या एकूण १० प्रश्नामध्ये डॉक्टर साहेबांनी केवळ तीनदाच ट्रेडर्सची मदत घेतली. डॉक्टर साहेब कधी कोणत्या प्रश्नाला अडतायत आणि आम्ही त्यांच्या बटव्यातले पैसे घेतोय, याची वाटच जणू सर्व ट्रेडर्स मंडळी पाहताना दिसून आले. मात्र,हुशार डॉक्टरांनी देखील क्लुप्त्या लढवत ट्रेडर्सनाच उत्तर खरेदी करण्यास भाग पाडले. त्याच्या या खेळाला दाद म्हणून शोच्या उत्तरार्धात ट्रेडर्सनी पठाण यांना स्टँन्डिंग ओवेशन देखील दिले. आत्मविश्वास आणि भाव करण्याची कुशाग्र कला असणा-या वासिम पठाण यांनी खेळलेला ट्रेडर्स सोबतचा हा सापशिडीचा डाव रसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे. ‘विकता का उत्तर’च्या सेटवर स्पर्धक बनून आलेल्या या डॉक्टरची ६० ट्रेडर्ससोबत कशी जुंपली, हे पाहणे रंजक ठरणार आहे.