Join us

‘हर मर्द का दर्द’ मालिकेतील झिनल बेलाणी कोणाला करतेय डेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 13:49 IST

जग कितीही टेक्नोसॅव्ही जगात वावरत असलो,कीतीही प्रगल्भ विचार असले तरीही एखादी (अविवाहित) अभिनेत्री आपल्या सह-कलाकाराबरोबर वेळ घालवत असेल तर ...

जग कितीही टेक्नोसॅव्ही जगात वावरत असलो,कीतीही प्रगल्भ विचार असले तरीही एखादी (अविवाहित) अभिनेत्री आपल्या सह-कलाकाराबरोबर वेळ घालवत असेल तर या दोघांमध्ये नक्कीच काही तरी सुरू असल्याच्या चर्चांना उधाण येते.सध्या या सगळ्या गोष्टी पसरायलाही वेळ लागत नाही.सोशल मीडियामुळे तर लोकप्रिय  कलाकारांच्या व्यक्तिगत जीवनात अधिकच बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे दिसते.एका सहकलाकाराबरोबरचे फोटो ‘इन्स्टाग्राम’वर अपलोड करताच येणा-या  प्रतिक्रियांमध्ये हा मुलगा किंवा मुलगी कोण असा प्रश्नांची हमखास विचारणा होत असते. ‘हर मर्द का दर्द’ मालिकेतील नायिका झिनल बेलाणीला अशाच काही प्रश्नांची उत्तरे देणे नाकीनऊ आणल्याचे पाहायला मिळतंय. सध्या झिनल कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे अशा चर्चाही सुरू आहे हे ऐकुण तिलाही आश्चर्याचा धक्काच बसला. या सहकलाकारबरोबर आपले काही प्रेमसंबंध असतील,अशी कल्पना तिने स्वप्नातही केलेली नव्हती. त्याचे झाले असे की,झिनलने तिचा सहकलाकार जिमीटसह असलेला एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आणि या फोटोमुळेच झिनल प्रेमात पडली असल्याच्या वावाडया उठू लागल्या.यासंदर्भात झिनलला विचारले असता तिने सांगितले, “त्या फोटोसाठी माझं अभिनंदन करणारे संदेश मिळाल्यावर मला खूपच हसू आले होते.पण आणखी गैरसमज पसरू नयेत,म्हणून मी ती पोस्ट डिलीट केली. जिमिटबरोबरचे माझं काम लोकांना पसंत पडत असल्याचं पाहून मला आनंद झाला. या क्षेत्रात तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे. मी माझं सारं लक्ष माझ्या करिअर केंद्रित केलं असून मी कोणाहीबरोबर सध्या डेटिंग करीत नाहीये.”