एकतासोबतच्या भांडणाबाबत चेतन काय म्हणतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 15:54 IST
एकता कपूरला छोट्या पडद्यावरची क्विन म्हटले जाते. बालाजी टेलिफ्लिम्सच्या मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हम ...
एकतासोबतच्या भांडणाबाबत चेतन काय म्हणतोय
एकता कपूरला छोट्या पडद्यावरची क्विन म्हटले जाते. बालाजी टेलिफ्लिम्सच्या मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हम पाच, क्योंकी साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की या त्यांच्या मालिका तर प्रचंड गाजल्या आहेत. एकताचे आतापर्यंत अनेक कलाकारांसोबत वाद झाले आहेत. त्यातील काहींनाच आपले प्रस्थ टिकवता आले. पण एकता कपूरसोबत कोणत्याही अभिनेत्याने पंगा घेतला तर त्याचे करियर जास्त काळ टिकत नाही असेच म्हटले जाते. कहानी घर घर की या मालिकेत चेतन हंसराजने प्रमुख भूमिका बजावली होती. त्यानंतर त्याने क्या हुआ तेरा वादा, कहानी हमारे महाभारत की यांसारख्या बालाजीच्या मालिकांमध्ये काम केले होते. पण दरम्यानच्या काळात त्याच्यात आणि एकतामध्ये भांडणे झाल्यामुळे तो बालाजी टेलिफ्लिम्सच्या मालिकांमध्ये झळकला नव्हता. पण आता त्या दोघांमध्ये झालेले वाद मिटले असून तो चंद्र-नंदिनी या मालिकेद्वारे बालाजी टेलिफ्लिम्सच्या मालिकेत परतला आहे. एकता कपूरसोबत शत्रूत्व घेतल्याचा आता मला पश्चाताप होत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. चेतन सांगतो, "माझे बालाजी टेलिफ्लिम्ससोबत जे वाद झाले होते, ते विसरून मी पुन्हा एकदा त्याच प्रोडक्शन हाऊससोबत काम करत आहे. जे झाले, ते अतिशय वाईट होते. आयुष्यात तुम्ही अशाच अनुभवांतून शिकत असता. मला ज्यावेळी चंद्र-नंदिनी या मालिकेविषयी विचारण्यात आले त्यावेळी क्षणात मी या मालिकेला होकार दिला. या मालिकेद्वारे मी माझ्या घरी परतलो आहे असेच मला वाटत आहे."