कामासाठी काय पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 15:31 IST
मयांक गांधी काला टीका या मालिकेत एका गतीमंद मुलाची भूमिका साकारत आहे. मयांकच्या या भूमिकेचे सध्या सगळेच कौतुक करत ...
कामासाठी काय पण...
मयांक गांधी काला टीका या मालिकेत एका गतीमंद मुलाची भूमिका साकारत आहे. मयांकच्या या भूमिकेचे सध्या सगळेच कौतुक करत आहेत. मयांकने नुकतेच अभिनेत्री हुनर हलीसोबत लग्न केले. पण लग्नानंतर दोनच दिवसांत त्याने मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केली आहे. मयांकची या मालिकेत एंट्री होऊन काहीच दिवस झाले आहेत. त्यामुळे त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा या मालिकेला पहिली पसंती दिली आहे. मालिकेच्या चित्रीकरणासाठी वेळ देणे गरजेचे असल्याने त्याने हनिमूनचा बेतही पुढे ढकलला आहे. मला माझ्या पत्नीच्या रूपात एक मैत्रीण मिळाली आहे. ती मला समजून घेत असल्याने तिनेदेखील माझा हा निर्णय स्वीकारला आहे असे मयांक सांगतो.