Join us

तेजश्रीचा हात पकडण्याआधी सुबोध भावेने हे काय केलं? अभिनेत्री बघतच राहिली, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:33 IST

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुबोधने केेलेल्या एका कृतीकडे सर्वांचं लक्ष वेधलंय

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या दोघांच्या आगामी मालिकेची सध्या चर्चा आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' असं या मालिकेचं नाव आहे. काहीच महिन्यांपूर्वी या मालिकेचा प्रोमो झी मराठीवर रिलीज झाला होता. प्रोमोपासूनच या मालिकेबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. अशातच या मालिकेचा आज खास इव्हेंट मुंबईत पार पडला. या इव्हेंटमध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत तेजश्रीचा हात पकडण्याआधी सुबोधने केलेली खास कृती लक्ष वेधून घेतेय. 

तेजश्रीचा हात पकडण्याआधी सुबोधने काय केलं?

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान दिसत आहेत. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या इव्हेंटवेळी हे दोघे सर्वांसमोर आले. यावेळी तेजश्री - सुबोधला एकत्र चालायचं होतं. म्हणूनच तेजश्रीने सुबोधला हात दिला. परंतु तेजश्रीचा हात हातात घेण्याआधी सुबोधने खिशातून रुमाल काढला आणि हात स्वच्छ पुसला.  याशिवाय त्याने तेजश्रीचा हातही वरवर पुसला. ही कृती केल्यानंतरच सुबोधने तेजश्रीचा हात पकडला. तेजश्री सुद्धा सुबोधच्या कृतीकडे पाहत राहिली. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे.

पण मित्रांनो, या व्हिडीओत दिसतं तो एका अॅक्टचा भाग आहे. सुबोध खरंच तेजश्रीसोबत इतका रुक्ष वागला नाहीये. 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सुबोध हा समर नावाची व्यक्तिरेखा साकारतोय. समरचा स्वभाव थोडासा विचित्र असल्याने सुबोधने या व्यक्तिरेखेप्रमाणे तेजश्रीला वागणूक दिली. तेजश्री या मालिकेत स्वानंदी ही व्यक्तिरेखा साकारत आहे.  'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेची उत्सुकता शिगेला आहे. ही मालिका ११ ऑगस्टपासून दररोज रात्री ७.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :तेजश्री प्रधान सुबोध भावे टेलिव्हिजनटिव्ही कलाकार