शशांकने हे काय केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 16:47 IST
जाना ना दिल से दूर या मालिकेत नुकतीच शशांक व्यासची एंट्री झाली. शशांक बालिकावधू या मालिकेमुळे प्रकाशझोतात आला. त्याची ...
शशांकने हे काय केले?
जाना ना दिल से दूर या मालिकेत नुकतीच शशांक व्यासची एंट्री झाली. शशांक बालिकावधू या मालिकेमुळे प्रकाशझोतात आला. त्याची ही पहिलीच मालिका प्रचंड हिट झाली होती. या मालिकेनंतर जाना ना दिल से दूर या मालिकेत तो एक वेगळी भूमिका साकारत आहे. तो एका सैनिकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सैनिकाची भूमिका साकारणे हे सोपे नाही याची त्याला चांगलीच कल्पना होती. या भूमिकेसाठी त्याने विशेष प्रशिक्षण घेतले आहे. त्याने त्याच्या या प्रशिक्षणाविषयी सोशल मीडियावरदेखील पोस्ट केले होते. सैनिकाची भमिका साकारण्यासाठी सैन्यातील एका अधिकाऱ्याने त्याला मदत केली. त्याने प्रशिक्षणादरम्यान त्याला प्रत्येक गोष्टी समजावून सांगितल्या. तसेच युद्धकथादेखील त्याला सांगितल्या. या सगळ्यामुळे शशांकला ही भूमिका साकारणे खूप सोपे गेले. या भूमिकेसाठी शरीर फिट असणे आवश्यक होते. त्यामुळे शशांकने अनेक तास जिममध्ये घामदेखील गाळला. खरे तर शशांकला व्यायाम करायला खूप आवडतो. तो चित्रीकरणात कितीही व्यग्र असला तरी दिवसातील एक तास तरी व्यायाम करतो. सैनिकांसारखी देहयष्ठी बनवण्याासाठी त्याला व्यायाम करण्यासोबतच त्याच्या जीभेवरदेखील ताबा ठेवायला लागला होता. पण रोज रोज डाएटचे फुड खावून त्याला कंटाळा आला असल्याने त्याने एक दिवस या सगळ्यातून सुट्टी घेऊन मस्त पिझ्झावर ताव मारला. याविषयी शशांक सांगतो, "रोज तेच तेच खावून मी पूर्णपणे कंटाळलो होतो. मला अनेक गोष्टी खाव्याशा वाटत होत्या. त्यामुळे मी एक दिवस तरी माझे डाएट विसरून माझ्या जिभेचे चोचले पुरवले."