Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये कृतिका शर्मा साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 14:19 IST

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्लस या वाहिनीवर गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. या ...

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका प्रेक्षकांना स्टार प्लस या वाहिनीवर गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. या मालिकेची लोकप्रियता इतक्या वर्षांत थोडी देखील कमी झालेली नाहीये. या मालिकेत आजवर अनेक कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. काही कलाकार मालिकेच्या सुरुवातीपासून या मालिकेचा भाग आहेत तर काहींनी अर्ध्या प्रवासातच या मालिकेला रामराम ठोकला आहे. ही मालिका स्टार प्लसवर सर्वाधिक काळ सुरू असलेली मालिका आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. प्रेक्षकांच्या लाडक्या ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत आता एका नव्या कलाकाराचा प्रवेश होणार आहे. नामवंत अभिनेत्री तान्या शर्माची मोठी बहीण कृतिका शर्मा आता या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तान्या शर्माने साथ निभाना साथिया या मालिकेत मीराची भूमिका साकारली होती.ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत कृतिका सुहानाची भूमिका रंगवणार आहे. तिची ही भूमिका नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सोनू के टिटू की स्वीटी या चित्रपटातील नुशरत भरूच्याच्या व्यक्तिरेखेवर आधारित असणार असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या या भूमिकाबद्दल कृतिका सांगते, “या मालिकेसाठी माझी निवड करण्यात आल्याचे मला सांगण्यात आले, तेव्हा मला अतिशय आनंद झाला. कारण ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेने गेली अनेक वर्षं प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. माझी सुहानाची व्यक्तिरेखा ही मिश्किल आणि बडबडी आहे. मालिका जसजशी पुढे सरकेल, तसतशी माझी भूमिका अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. मला एक चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाली असून गेली अनेक वर्षं सुरू असलेल्या आणि आजही लोकप्रिय असलेल्या या मालिकेत मी भूमिका रंगविणार असल्याने मी खूप खूश आहे.”ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे थपकी प्यार की या मालिकेतील सहकलाकार गौरव वाधवासोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी कृतिका शर्माला मिळत असल्याने ती चांगलीच खूश झाली आहे. Also Read : 'ये रिश्ता क्या कहलाता है' कपलचे सिजलिंग फोटोशूट तुम्ही पाहिलेत का?