Join us

'सारं काही तिच्यासाठी'मध्ये लगीनसराई! श्रीनूऐवजी निशीची उष्टी हळद नीरजला लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 16:12 IST

Sara Kahi Tichyasathi Serial : 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. खोतांच्या घरात श्रीनू आणि निशीच्या लग्नांची जोरदार तयारी सुरू आहे.

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. खोतांच्या घरात श्रीनू आणि निशीच्या लग्नांची जोरदार तयारी सुरू आहे. मेहंदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आता हळदीचा कार्यक्रम होणार आहे. 

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत श्रीनू आणि निशीच्या लग्नाची तयारी जोरावर आहे. लग्नाच्या गडबडीत नीरज आणि श्रीनूची गाठभेट होते, आणि नीरज त्याच्याकडून एक वचन घेतो की निशीला  लग्नानंतर ही बॅडमिंटन खेळण्याची परवानगी असु दे. इथे उमासुद्धा श्रीनूला निशीचा खेळ चालू रहावा म्हणून विनंती करते. उमा आणि नीरजच बोलणं ऐकून श्रीनू रघुनाथकडे निशाला खेळ चालू ठेवण्याची परवानगी मागायला  जातो. 

तर अंगणात निशी-श्रीनू हळदीचा मांडव बांधला गेला आहे आणि मांडवात हळदीचा कार्यक्रम होत असताना योगायोगाने श्रीनूची उष्टी हळद ओवीला लागते आणि निशीला लागलेली हळद नीरजला लागते. आता रघुनाथ निशीला लग्नानंतर हे खेळ सुरु ठेवण्याची परवानगी देईल का? एकमेकांची उष्टी हळद लागलेली पाहून ओवी-निशी आणि श्रीनू-नीरजच्या निर्णयात काही बदल होईल का? ओवी, खरच देश सोडून जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे 'सारं काही तिच्यासाठी'च्या येणाऱ्या भागांमध्ये दडली आहेत.