कॉमेडियन भारती सिंग आणि पटकथा लेखक-टीव्ही होस्ट हर्ष लिम्बाचिया दुसऱ्यांदा पालक बनणार आहेत. आधीच एका मुलाचे पालक असलेले हर्ष आणि भारती यांना यावेळी मुलगी हवी आहे. मात्र, नुकत्याच त्यांच्या 'भारती टीव्ही' या यूट्यूब चॅनेलवर एका पॉडकास्टमध्ये, हर्षने खुलासा केला की ते तिसऱ्या मुलाचे प्लानिंग करत आहेत.
नुकतेच या जोडप्याने त्यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेला आमंत्रित केले होते. यावेळी मातृत्व प्रवासावर चर्चा करताना सोनालीने सांगितले की, तिला फक्त एकच मूल आहे. यावर, भारती सिंगने दुसऱ्यांदा आई होण्याबद्दल तिच्या चिंता व्यक्त केल्या. यावर सोनालीने तिला सांगितले की भारती आधीच एक अनुभवी आई आहे. चर्चा पुढे नेत हर्ष म्हणाला, "आम्ही थांबणार नाही, भारती."
''मुलगा झाला तर आम्ही आणखी एकदा...''जेव्हा सोनाली बेंद्रेने हर्षच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केले, तेव्हा हर्ष पुढे म्हणाला, "तीन हा माझा लकी नंबर आहे." त्यानंतर भारती सिंगने सविस्तरपणे सांगितले, "हा म्हणतो की आम्ही थांबणार नाही. आम्हाला मुलगी हवी आहे, म्हणून आम्ही विचार केला की जर यावेळीही मुलगा झाला, तर आम्ही आणखी एकदा प्रयत्न करू. मग मी त्याला विचारले, जर तिसरे मूलही मुलगा झाला तर? तो म्हणाले, 'आपण पुन्हा प्रयत्न करू.' म्हणजे, मी मरेपर्यंत मॅम, आम्ही हे करत राहू." हर्षने पुढे स्पष्ट केले, "मुलगी असो वा मुलगा, आम्ही सुरुवातीला विचार केला होता की आम्ही दुसरे मूल करणार नाही. पण जर हा मुलगा झाला तर मलाही मुलगीच हवी आहे."
भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचियाने २०१७ साली केलं लग्नभारती सिंगने हर्ष लिम्बाचियासोबत काही काळ डेटिंग केल्यानंतर २०१७ मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. या जोडप्याने ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांचा मुलगा लक्षचे स्वागत केले. यावर्षी ऑक्टोबरमध्ये, भारती आणि हर्षने इंस्टाग्रामवर त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्यांनी ६ ऑक्टोबरला दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते, "आम्ही पुन्हा प्रेग्नेंट आहोत. आशीर्वाद. गणपती बाप्पा मोरया. देवाचे आभार, लवकरच येत आहे."
वर्कफ्रंटभारती सिंग सध्या 'लाफ्टर शेफ्स'च्या तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहे. या कुकिंग शोमध्ये अली गोनी, एल्विश यादव, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अभिषेक कुमार, कृष्णा अभिषेक, जन्नत जुबैर, गुरमीत चौधरी, देबिना बोनर्जी आणि विवियन डीसेना यांसारखे अनेक सेलिब्रिटी शेफ सहभागी आहेत. दुसरीकडे, हर्ष लिम्बाचिया 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या ११ व्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहे. या शोचे परीक्षक म्हणून नवज्योत सिंग सिद्धू, शिल्पा शेट्टी आणि शान आहेत आणि हा शो सोनीलिव्हवर स्ट्रीम केला जाऊ शकतो.
Web Summary : Bharti Singh and Harsh Limbachiyaa, expecting their second child, are already planning for a third! They desire a daughter and will keep trying until they have one, Harsh revealed. Currently, Bharti hosts 'Laughter Chefs,' and Harsh hosts 'India's Got Talent.'
Web Summary : भारती सिंह और हर्ष लिंबाचिया, जो अपने दूसरे बच्चे की उम्मीद कर रहे हैं, पहले से ही तीसरे की योजना बना रहे हैं! हर्ष ने खुलासा किया कि उन्हें एक बेटी चाहिए और वे तब तक कोशिश करते रहेंगे जब तक कि उनके पास एक न हो। फिलहाल, भारती 'लाफ्टर शेफ्स' होस्ट करती हैं, और हर्ष 'इंडियाज गॉट टैलेंट' होस्ट करते हैं।