Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आम्ही दोघे राजा-राणी मालिकेत लग्नाचा ग्रँड सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 11:51 IST

आम्ही दोघे राजा राणी या मालिकेत पार्थ आणि मधुराचे लग्न कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. मुंबईकर आणि ...

आम्ही दोघे राजा राणी या मालिकेत पार्थ आणि मधुराचे लग्न कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. मुंबईकर आणि पुणेकर यांच्यातील धमाल टशन आपल्याला या मालिकेत पाहायला मिळते. पार्थ आणि मधुरा या दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण आता पार्थने त्याच्या आजीची तर मधुराने तिच्या वडिलांची समजूत काढल्यानंतर त्यांना लग्नाची परवानगी मिळालेली आहे. आता पार्थ आणि मधुरा यांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा खूप ग्रँड होणार असून गोठ, नकुशी, लेक माझी लाडकी, पुढचे पाऊल, दुहेरी या मालिकांमधील कलाकारदेखील पार्थ आणि मधुराच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. एवढेच नव्हे तर तर या लग्न सोहळ्यात ते त्यांचे परफॉर्मन्सदेखील सादर करणार आहेत. आम्ही दोघे राजा राणी या मालिकेत मधुराचे वडील हे प्रचंड कंजूष दाखवलेले आहेत. त्यांनी लग्नाचा काहीही खर्च न करता खर्चाची सगळी जबाबदारी मुलाच्या कुटुंबियांवर टाकली आहे. तसेच पार्थच्या आजीने लग्नाला परवानगी दिली असली तरी तिला अजूनही मधुरा मनापासून पसंत नाहीये. आपल्या नातवासाठी पार्थची बॉस तनुश्रीच योग्य असल्याचे तिचे म्हणणे आहे. या लग्नात तनुश्रीदेखील हजेरी लावणार आहे आणि पार्थ आणि मधुराचे लग्न होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमात तर ती स्वतःला हळद लावून घेणार आहे आणि त्यानंतर मधुराची अंगठीदेखील गायब करणार आहे. पण इतका गोंधळ होऊनही पार्थ आणि मधुराचे लग्न दणक्यात पार पडणार आहे. या मालिकेत आपल्याला पार्थ आणि मधुराच्या लग्नानंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर कधीही मुलगी मुलाच्या घरी जाते. पण मधुरासोबत तिच्या घरचे तिच्या सासरी राहायला येणार आहेत. त्यामुळे मालिकेत धमाल येणार आहे यात काही शंकाच नाही.