Join us

‘हम है राही प्यार के’ मालिका रुपात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 14:00 IST

नव्वदीच्या दशकात गाजलेला हम है राही प्यार के हा सिनेमा मालिका रुपात रसिकांच्या भेटीला येणार आहे.. वाचून आश्चर्य वाटलं ...

नव्वदीच्या दशकात गाजलेला हम है राही प्यार के हा सिनेमा मालिका रुपात रसिकांच्या भेटीला येणार आहे.. वाचून आश्चर्य वाटलं असेल,मात्र हे खरं असून आगामी मीनू मौसी या मालिकेत 'हम है राही प्यार के' या सिनेमाच्या कथेचा प्लॉट रसिकांना पाहायला मिळणार आहे.. हर्षद चोप्रा आणि सनाया इराणी मीनू मौसी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहेत.'हम है राही प्यार के' या सिनेमातील आमिरप्रमाणे सनाया आपल्या मोठ्या बहिणीच्या मुलांचा सांभाळ करताना पाहायला मिळेल.तर हर्षद हा सनायाच्या नायकाचा म्हणजेच हम है राही प्यार के या सिनेमातील जुहीप्रमाणे भूमिका साकारत तिला या मुलांचा सांभाळ करण्यास मदत करताना दिसेल.त्यामुळं छोट्या पडद्यावर 'हम है राही प्यार के' सिनेमाची जादू पुन्हा एकदा रसिकांना एका वेगळ्या ढंगात पाहायला मिळणार आहे.