Join us
Daily Top 2Weekly Top 5

शूटिंग पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीने मालिकेला आणला अडथळा? पुरब कोहलीने गावंक-यांची कोणती ईच्छा केली पूर्ण?जाणून घेण्यासाठी वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 17:06 IST

P.O.W बंन्दी युध्द की मालिकेची शूटिंग नुकतीच पंजाबच्या छोट्याशा गावात करण्यात आली.मालिकेत पुरब कोहली  नायब सुबेदार सरताज सिंघ यांची ...

P.O.W बंन्दी युध्द की मालिकेची शूटिंग नुकतीच पंजाबच्या छोट्याशा गावात करण्यात आली.मालिकेत पुरब कोहली  नायब सुबेदार सरताज सिंघ यांची भूमिका साकरतोय. सुबेदार सरताज सिंघ हे तब्बल 70 वर्षानंतर पाकिस्तानच्या तावडीतून आपली सुटका करत मायदेशी परततात या कथेभोवती मालिका फिरते.मलिकेची शूटिंग एका छोट्याशा गावात होत असल्यामुळे शूटिंग पाहण्यासाठी गांवक-यांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.या गर्दीत अतीउत्साही तरूणांचाही समावेश होता. एकीकडे तुफान गर्दी तर दुसरीकडे या तरूणांची कलाकारांबरोबर सेल्फी घेण्यासाठी धडपत होत होती.जस जसा वेळ जात होता तसतशी बघ्यांची गर्दीही जास्त होत असल्यामुळे शेवटी मालिकेच्या  शूटिंग  अडथळा येत होता आटोक्यात न येणा-या गर्दीमुळे मालिकेचे शूटिंग थांबवावे लागतेय की काय अशी चिंता मालिकेच्या टीमला सतावत होती. त्याचवेळी P.O.Wच्या रिल होरो प्रमाणेच रिअल हिरो बनत पुरब कोहलीने तिथे जमलेल्या गांवक-यांना समजावत जमलेल्या गर्दीवर कसेबसे नियंत्रण मिळवले.पंजाबी मुंडा आणि त्यात पंजाबी भाषा अवगत असल्यामुळे पुरबला गर्दीला आटोक्यात करणे शक्यही झाले अखेर काही वेळा पुरती थांबलेले मालिकेच्या शूटिंगला पुन्हा सुरूवात करण्यात आली. पुरबने यावेळी जमलेल्या लोकांबरोबर सेल्फीही काढले. याविषयी पुरब कोहली सांगतो की, एका गावात शूटिंग पाहण्यासाठी गर्दी होणे हे साहजिक आहे.शूटिंगवेळी जमलेल्या गांवक-यांना कलाकारांबरोबर एक सेल्फी काढायची ईच्छा होती.त्यांची ईच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी नंतर कोणत्याही प्रकारचा गोंधळ केला नाही. अखेर  मालिकेचे शूटिंग पूर्ण होणे हे महत्वाचे होते.