Join us

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांच्या लग्नाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 19:19 IST

कपिल शर्माने छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासोबतच त्याच्या आयुष्यात नुकतीच एक खूप चांगली घटना घडली आहे. कपिल शर्माने नुकतीच त्याची प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली.

ठळक मुद्देकपिल शर्माने त्याच्या लग्नाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत लग्नविधी, लग्नातील डेकोरेशन त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. 

कपिल शर्माला द ग्रेट इंडियन चाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाच्या अनेक सिझनचे विजेतेपद त्याने मिळवले. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाने तर त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. त्यानंतर त्याचा द कपिल शर्मा शो देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला. पण कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांची भांडणं झाल्यानंतर सुनील, अली असगर यांसारख्या कलाकारांनी या कार्यक्रमाला रामराम ठोकला आणि या कार्यक्रमाला उतरती कळा लागली. सततच्या आजारपणामुळे कपिल अनेकवेळा या कार्यक्रमाचे चित्रीकरण ऐनवेळी रद्द करत होता. त्यामुळे हा कार्यक्रम काही कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय सोनी वाहिनीने घेतला होता. पण आता द कपिल शर्मा हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. 

कपिल शर्माने छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासोबतच त्याच्या आयुष्यात नुकतीच एक खूप चांगली घटना घडली आहे. कपिल शर्माने नुकतीच त्याची प्रेयसी गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. कपिलने पंजाबी पद्धतीने लग्न केले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोत कपिल पांढऱ्या रंगाच्या शेरवानीत दिसला होता. त्याने डोक्यावर गुलाबी रंगाची पगडी घातली होती तर गिन्नीने गुलाबी रंगाचा लहंगा आणि त्यावर भरभक्कम दागिने घातले होते. जालंधर येथे कपिलचे लग्न झाले होते. लग्नात पंजाबी गायक गुरदास मान यांनी स्पेशल परफॉर्मन्स देत या लग्नाला ‘चार चांद’ लावले होते. त्यानंतर कपिलने अमृतसर आणि मुंबई अशा दोन ठिकाणी आपल्या मित्रमैत्रिणींसाठी आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन आयोजित केले होते. त्याच्या मुंबईच्या रिसेप्शनला तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. 

आता कपिल शर्माने त्याच्या लग्नाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत लग्नविधी, लग्नातील डेकोरेशन त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. 

गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिये’ या शोमध्येही एकत्र काम केले होते.

टॅग्स :कपिल शर्मा