असा झाला ‘द व्हॉईस इंडिया किड्स’मध्ये एक अप्रतिम मेकओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 15:01 IST
पलक मुच्छल,शान,हिमेश रेशमिया आणि पापोन या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या तालमीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या तरुण गायकांची अद्वितीय प्रतिभा आणि सुमधूर आवाजाने 'द ...
असा झाला ‘द व्हॉईस इंडिया किड्स’मध्ये एक अप्रतिम मेकओव्हर
पलक मुच्छल,शान,हिमेश रेशमिया आणि पापोन या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या तालमीत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या तरुण गायकांची अद्वितीय प्रतिभा आणि सुमधूर आवाजाने 'द व्हॉईस इंडिया किड्स' हा गायनावर आधारित रिअॅलिटी शो प्रेक्षकांचे अखंडित मनोरंजन करीत आहे आणि गायनासोबतच प्रचंड मनोरंजन करत या शोमधील नवनव्या थिमची वैशिष्ट्ये प्रेक्षकांना टेलिव्हिजन सेटसमोर खिळवून ठेवतात.व्हॉईस इंडिया किड्सचा आगामी भाग वेगळा नसेल;पण या भागात,पलकच्या टीममधील स्पर्धक मनशीची, तिच्या वडिलांना एखाद्या स्टारप्रमाणे पेहराव केलेला पाहण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार,मनशीच्या पोल खोल सत्रादरम्यान, तिने तिच्या वडिलांवर कधीही चांगले कपडे परिधान न केल्याचा आरोप केला आहे. आपल्या वडिलांनी सलमान खानसारखे कपडे परिधान करावेत अशी इच्छा ती वक्त करते.एका गोंडस लहान मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मनशीच्या वडिलांचे रूप बदलण्यासाठी टीम ही जबाबदारी स्वीकारते.मनशीचे वडिल नव्या लुकमध्ये अतिशय ऐटबाज दिसतात. ते पाहून प्रशिक्षकांसह मनशीही आवाक् होऊन जाते.स्पाइक केलेले केस आणि ट्रेण्डी चष्मा,काळ्या रंगाचे मोहक जॅकेट आणि ट्रेण्डी बुट घालून ते स्टेजवर अवतरतात.हा दमदार मेकओव्हर पाहून सेटवर उपस्थित सर्व महिला त्यांच्याकडे ऑटोग्राफची मागणी करतात.संपूर्ण शो आणखी मनोरंजक बनतो,जेव्हा या शोचा विनोदी होस्ट जय या नव्या स्टारला ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यावर स्टेजवर उपस्थित महिलांसोबत सलमान खानसारखे थिरकण्याची विनंती करतो.सेलिब्रिटीसारख्या या बदलेल्या रुपासंदर्भात मनशीचे वडील म्हणाले, “मला माझे नवे रूप आवडले.रूप बदलल्यानंतर आणि मेक-ओव्हरनंतर मी २० वर्षांचा आहे की काय असा भास होऊ लागला.”Also Read:चिमुरड्याने जिंकली सा-यांची मनं‘द व्हॉईस इंडिया किड्स’ त्यातील प्रतिभाशाली मुलांच्या गाण्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्येच नाही तर इंडस्ट्रीतील बर्याच जणांना प्रभावित करत आहे.येणार्या भागात प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सर्व स्पर्धक प्रयत्न करत असताना एका लहान मुलाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले असून त्याच्या परफॉर्मन्सने मार्गदर्शकांनादेखील अवाक केले आहे.अवघ्या चार वर्षांच्या या मुलाने स्टेजवर गाणे गाऊन सगळ्यांचीच मने जिंकून घेतली आहे.