कलाकारांमध्ये वाद आणि भांडणं हे काही नवं नाही.दीपिका सिंग-अनस रशीद आणि सोनल वेंगुर्लेकर-अंकुश अरोरा यांचं स्लॅपगेट प्रकरण बरंच गाजलं. आता आणखी एका कलाकारांन दुस-या एका प्रसिद्ध कलाकाराच्या श्रीमुखात लगावल्याचं प्रकरण समोर आलंय. अभिनेता सिद्धार्थ सागर म्हणजे सेल्फी मौसीनं कॉमेडी क्वीन भारती सिंगच्या श्रीमुखात लगावल्याच्या चर्चा रंगल्यात. हे सारं प्रकरण काही महिन्यांआधी 'कॉमेडी नाईट्स लाइव्ह' शोमध्ये घडलं होतं.मात्र त्यावेळी हे प्रकरण हसण्यावर नेलं असलं तरी शो संपल्यावर भारतीचा पार चांगलाच चढल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या. इतकंच नाही तर या शोमध्ये सिद्धार्थ किंवा मी राहिल अशी अटच भारतीनं घातली होती. यानंतर सिद्धार्थला 'कॉमेडी नाईट लाइव्ह' हा शो सोडावा लागला होता. सिद्धार्थनं मात्र स्क्रीप्टनुसार हे सगळं घडल्याची सारवासारव केलीय.
OMG खरंच त्याने भारतीच्या श्रीमुखात लगावली होती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 16:01 IST