Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाजिद खान या कार्यक्रमात दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:45 IST

सा रे ग म पा कार्यक्रमाच्या 2016 मधील आवृत्तीत परीक्षक म्हणून काम केलेला वाजिद आता यंदा पुन्हा एकदा परीक्षक म्हणून या कार्यक्रमात परतणार आहे.

ठळक मुद्दे सा रे ग म पा कार्यक्रमात साजिदला वाजिद करणार मिसवाजिद खानसोबत शेखर रावजियानी आणि सोना मोहपात्रा परीक्षकाच्या भूमिकेत

झी टीव्ही वरील लोकप्रिय शो सारेगमपा पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या शोमधून संगीताच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याची आणखी एक संधी होतकरू गायकांसाठी उपलब्ध झाली आहे. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात नामवंत बनलेल्या श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, कमाल खान, अमानत अली, राजा हसन, संजीवनी आणि बेला शेंडे हे आणि यासारखे काही गायक-गायिका या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच जगासमोर आले होते. आगामी सारेगमपा शोचे नामवंत गायक आणि संगीतकार वाजिद खान परीक्षक असणार आहेत.

वाजिद खान हा सा रे ग म पा या कार्यक्रमाशी पूर्वीपासून निगडित असून त्याने पूर्वीही या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहिले होते. सा रे ग म पा कार्यक्रमाच्या 2016 मधील आवृत्तीत परीक्षक म्हणून काम केलेला वाजिद यंदा पुन्हा एकदा परीक्षक म्हणून या कार्यक्रमात परतणार आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांना आपले गायन सुधारण्यासाठी तो त्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहे. या स्पर्धकांचे गायन अधिक सपाईदार करून त्यांना त्यात सुधारणा करण्यासाठी तो त्यांना आपला अनुभवाचा सल्ला देईल.

वाजिद खान म्हणाला, “सा रे ग म पा कार्यक्रमाच्या आगामी भागात मला सहभागी होता येणार आहे, या कल्पनेनेच मी खुश झालो आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या गाण्याचे परीक्षण करण्याशी माझा जुना संबंध आहे. मी यापूर्वी तीनवेळा साजिदबरोबर या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम केले आहे. आगामी आवृत्तीत मात्र मी एकटा असेन. मला साजिदची आठवण येऊन चुकल्यासारखे नक्कीच वाटेल. आजच्या पिढीतील वैविध्यपूर्ण आवाज पुन्हा ऐकण्यास मी उत्सुक झालो आहे. यंदा या कार्यक्रमात परीक्षक मंडळात माझ्या जोडीला शेखर रावजियानी आणि सोना मोहपात्रा हे दोघे असतील. मला त्यांच्याकडूनही बरेच काही शिकता येईल. यंदा यातील गायनकलेचा स्तर आम्ही अधिक उंचावणार आहोत.”

 

टॅग्स :वाजिद