Join us
Daily Top 2Weekly Top 5

वत्सल जस्ट मोहोब्बतच्या रिमेकची वाट पाहतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 12:59 IST

एका लहान मुलाच्या आयुष्यावर बेतलेली जस्ट मोहोब्बत ही मालिका खूप गाजली होती. आज या मालिकेला अनेक वर्षं झाली असली तरी ...

एका लहान मुलाच्या आयुष्यावर बेतलेली जस्ट मोहोब्बत ही मालिका खूप गाजली होती. आज या मालिकेला अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेत जयची भूमिका साकारणारा वत्सल सेठ सध्या रिश्तो का सौदागर -बाजीगर या मालिकेत काम करत आहे. वत्सलची जस्ट मोहोब्बत ही पहिली मालिका होती. प्रेक्षकांना आजही माझी पहिली मालिका लक्षात आहे याचा मला प्रचंड आनंद होत असल्याचे वत्सल सांगतो. या मालिकेचा रिमेक केला जावा अशी वत्सलची इच्छा आहे. या मालिकेचा रिमेक झाल्यास त्यात काम करायला नक्कीच आवडेल असेही तो सांगतो. जस्ट मोहोब्बत या मालिकेचे केवळ सामान्य लोकच फॅन्स आहेत असे नाही तर बॉलिवुड अभिनेता वरुण धवनही या मालिकेचा फॅन आहे. जस्ट मोहोब्बत ही मालिका वरुणला लहानपणी खूप आवडायची असे त्याने वत्सलला भेटल्यावर सांगितले होते.