Join us
Daily Top 2Weekly Top 5

'विठुमाऊली'च्या कलाकारांना मिळाला थक्क करणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 06:30 IST

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विठुमाऊली' मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी कलाकारांना पत्र पाठवून तर कधी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन चाहते या मालिकेविषयीचे प्रेम व्यक्त करत असतात.

ठळक मुद्देकोकणातील काही मंडळींनी घेतली विठुमाऊलीच्या कलाकारांची भेट विठुमाऊलीच्या कलाकारांसाठी त्यांनी आणली खास भेट

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विठुमाऊली' मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. कधी कलाकारांना पत्र पाठवून तर कधी सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन चाहते या मालिकेविषयीचे प्रेम व्यक्त करत असतात. चाहत्यांच्या याच प्रेमापोटी 'विठुमाऊली' टीआरपीचे उच्चांग गाठत आहे. असाच एक थक्क करणारा अनुभव नुकताच विठुमाऊलीच्या कलाकारांनी घेतला. 

कोकणातून काही खास चाहते मंडळी या कलाकारांना भेटण्यासाठी गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये असलेल्या 'विठुमाऊली'च्या सेटवर पोहोचली. लाडक्या कलाकारांना भेटण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. इतकेच नाही तर विठुमाऊलीच्या कलाकारांसाठी त्यांनी खास भेटही आणली होती. चाहत्यांचे हे प्रेम पाहून रुक्मिणीची भूमिका साकारणारी एकता लब्दे भारावून गेली होती. कौतुकाची ही थाप नवे काहीतरी करण्याचे बळ देते. विठुमाऊली मालिकेमुळे मी देशभरात पोहोचले याचा विशेष आनंद वाटतो असे एकता लब्देने सांगितले.

'विठुमाऊली' मालिकेमधून विठुरायाच्या दिव्यत्वाची प्रचिती प्रेक्षकांना मिळत असते. भक्तीचा हा प्रवास उत्तरोत्तर रंजक होणार आहे. 'विठुमाऊली' या मालिकेच्या माध्यमातून प्रथमच सावळ्या विठ्ठलावर आणि त्याच्या सख्यांवर आधारित मालिका मराठी टेलिव्हिजनवर पाहायला गेल्या एक वर्षापासून मिळत आहे. संत, भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचे माणूसपण, त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचे वेगळेपण आहे. या आधी ही या आधी ही कोठारे व्हिजनने जय मल्हार, मन उधाण वाऱ्याचे, गणपती बाप्पा मोरया अशा अनेक प्रसिद्ध मालिका छोट्या पडद्याला दिल्या आहेत.

टॅग्स :विठुमाऊलीस्टार प्रवाह