Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तन्वी खूप निगेटिव्ह व्यक्ती आहे, ती विजेती नको...", मराठी अभिनेत्रीची तन्वी कोलतेवर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:33 IST

अख्खा सीझन फक्त फेक वागली..., मराठी अभिनेत्रीची तन्वी कोलतेवर टीका

बिग बॉस मराठी सीझन ६ चा येत्या रविवारी १९ एप्रिल रोजी ग्रँड फिनाले आहे. या सीझनचा विजेता किंवा विजेती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद, अनुश्री माने आणि विशाल कोटियन हे टॉप फाईव्ह सदस्य आहेत. यामध्ये तन्वी कोलते विजेतेपदासाठी दावेदार मानली जात होती. मात्र गेल्या एव्हिक्शनला तन्वी कोलतेने विशाल आणि अनुश्रीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तिच्यावर आता जबरदस्त टीका होत आहे. 'तन्वीला वोट करणार नाही' असाच प्रेक्षकांचा सूर आहे. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारने तन्वीवर चांगलीच टीका केली आहे. 

तन्वी कोलतेसंदर्भात नुकतीच किरण मानेंनी एक पोस्ट लिहिली होती.  त्यात त्यांनी तन्वीवर टीका करत त्यांच्या सीझनवेळी अपूर्वा नेमळेकरसोबतचा झालेला वाद आणि नंतर झालेला बाँड याबद्दल लिहिलं होतं. त्या पोस्टवर अभिनेत्री विशाखा सुभेदारने कमेंट करत लिहिले, "तन्वी इतका तिरस्कार करतेय विशालचा. याचं कारण काहीच नाहीये. शेवटी शेवटी तिचा जो मुखवटा होता तो अक्षरशः गळून पडला आहे आणि आता दिसतेय खरी तन्वी.. आणि विशेष वाटतंय की इतक्या निगेटिव्ह व्यक्तीला बिग बॉस अख्खा सीझन पॉझिटिव्ह दाखवत राहिले. आत्ताचा तिचा स्क्रीनवरचा प्रेझेन्स नको नको झालाय. आता तर ती सोडून कोणीही विजेता चालेल..पण ती नको. खूप जास्त निगेटिव्ह व्यक्ती आहे ती.. रुचिता तर खूप चांगली होती तन्वीची Av पाहण्यात काहीही इंटरेस्ट नाही. अख्खा सीझन फक्त फेक वागली आहे."

तन्वी असं काय बोलली होती?

गेल्या आठवड्यात रेवा कौरसे घरातून बाहेर गेली. रेवा आणि तन्वीची चांगली मैत्री होती. रेवा घराबाहेर जाऊन अनुश्री आणि विशाल फायनलिस्ट झाल्याने तन्वीचा चेहराच पडला होता. तन्वी सर्वांसमोर म्हणाली की, 'खोटारडेपणा आणि धक्काबुक्की घरात राहिले, माझी चांगल्या मनाची मैत्रीण घराबाहेर गेली' असं वक्तव्य केलं होतं. यावरुन तन्वीला किती गर्व चढला आहे अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली. तन्वीला वोट करायचं नाही असाच सूर सोशल मीडियावर उमटला. आता तन्वीला तिचं हे वक्तव्य महागात पडणार का हे १९ एप्रिललाच कळेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi actress slams Tanvi Kolte, says she shouldn't win Bigg Boss.

Web Summary : Actress Vishakha Subhedar criticized Tanvi Kolte's negativity on Bigg Boss Marathi 6. She expressed disappointment with Tanvi's behavior towards Vishal and Anushree, stating she prefers anyone else winning. The grand finale is approaching, and Tanvi's recent comments have sparked controversy among viewers.
टॅग्स :तन्वी कोलतेमराठी अभिनेताबिग बॉस मराठी ६