गोठ या मालिकेतील विलास आणि राधा बनले वीरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 14:23 IST
एखादी मालिकेतील जोडी प्रेक्षकांना आवडली तर तिचे लोकांनी नामकरण करणे यात काही नवीन नाही. जोडी रिअल लाइफमधील असो वा ...
गोठ या मालिकेतील विलास आणि राधा बनले वीरा
एखादी मालिकेतील जोडी प्रेक्षकांना आवडली तर तिचे लोकांनी नामकरण करणे यात काही नवीन नाही. जोडी रिअल लाइफमधील असो वा रिल लाइफमधील प्रेक्षक अनेक जोड्यांचे नामकरण करत असतात. करिश्मा तन्ना आणि उपेन पटेल यांचे अफेअर असताना त्यांचे फॅन्स त्यांना उपमा या नावाने हाक मारत असत. आता एका मालिकेतील जोडीला प्रेक्षकांने एक खूप चांगले नाव दिले आहे.गोठ ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. या मालिकेची कथा, या मालिकेची व्यक्तिरेखा सगळे प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील राधा आणि विलास हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण आहेत. या दोघांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना खूपच आवडते. आता या राधा आणि विलास यांच्या जोडीला नवे नाव मिळाले आहे. राधा आणि विलास यांना प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असल्याने त्यांचे फॅन्स नेहमीच त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील प्रेक्षक त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्यांच्या फोटोंवर नेहमीच प्रतिक्रिया देत असतात. त्यांची ही लोकप्रियता पाहाता विलास आणि राधा यांच्या जोडीसाठी प्रेक्षकांनी एखादे नाव सुचवावे असे आवाहन सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना करण्यात आले होते. त्यासाठी वीरा, विधा आणि रावी असे तीन पर्यायदेखील देण्यात आले होते. या तिघांमशून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी वीरा या नावाची निवड केली असून त्यांनी आपल्या प्रतिक्रियांमध्ये या दोघांच्या जोडीला वीरा हेच नाव योग्य असल्याचे म्हटले आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमासाठी सध्या राधा आणि विलास खूपच खूश आहेत.