Join us

विक्रांत सरंजामे करतोय ईशासाठी 'या' गोष्टीचा सराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 20:30 IST

वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्देडिसेंबरच्या अखेरीस अभिनेत्री शिल्पा तुळसकरची मालिकेत एंट्री होणार आहे

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी कहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे.

वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोघांच्या आर्थिक परिस्थिती, राहणीमान आणि वयामध्ये फरक आहे आणि म्हणूनच काही लोकांना त्या दोघांनी एकत्र येणं मान्य नाहीये. त्यांच्या प्रेमाचा प्रवास खडतर असेल कि सोपा हे तर वेळच ठरवेल, पण तूर्तास विक्रांत सरंजामे ईशाला लग्नाची मागणी घालण्याचा सराव करताना दिसतो आहे. सगळा धीर आणि हिम्मत एकवटून विक्रांत ईशाला लग्नासाठी मागणी घालणार आहे. विक्रांतची मागणी घालण्याची पद्धत देखील तितकीच हटके आणि रोमांचक असणार आहे. इतक्या हटके पद्धतीने मागणी घातल्यावर ईशाचं उत्तर हो असेल यात तर शंकाच नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरीस अभिनेत्री शिल्पा तुळसकरची मालिकेत एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे विक्रांतचा शत्रू असलेल्या जालिंदरशी निगडीत तिची भूमिका असणार आहे. दुसरीकडे विक्रांत इशाला लवकरच प्रपोज करणार आहे. अशातच शिल्पाच्या एण्ट्रीमुळे मालिकेच्या कथानकात कमालीचं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :तुला पाहते रेसुबोध भावे गायत्री दातार