Join us
Daily Top 2Weekly Top 5

बंदगी कालरासोबत अनकंट्रोल रोमान्स करणाऱ्या पुनीश शर्माच्या लग्नाचे पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 19:21 IST

‘बिग बॉस ११’मध्ये सहभागी झालेले बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा हे दोन स्पर्धक सध्या त्यांच्यातील रोमान्समुळे चांगलेच चर्चेत आहेत. ...

‘बिग बॉस ११’मध्ये सहभागी झालेले बंदगी कालरा आणि पुनीश शर्मा हे दोन स्पर्धक सध्या त्यांच्यातील रोमान्समुळे चांगलेच चर्चेत आहेत. वास्तविक दोघांनीही घरात फार काही कमाल दाखविली नाही, परंतु दोघांमधील अनकंट्रोल रोमान्स जबरदस्त चर्चेत आहे. दोघांमधील रोमान्समुळे केवळ घरातील सदस्यच हैराण झाले नाहीत, तर शोचा होस्ट सलमान खानही सध्या त्याच्या या प्रतापाला वैतागला आहे. त्यामुळे सातत्याने तो दोघांना असे न करण्याची वॉर्निंग देत आहे. असो, या दोघांचे प्रेमप्रकरण घरात जरी बहरत असले तरी, घराबाहेर मात्र त्यांच्यातील या रोमान्समुळे खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर बाहेरील जगतात दोघांच्या अनेक किश्श्यांचे खुलासेही समोर येत आहेत. सध्या पुनीश शर्मा हा निशाण्यावर असून, तो विवाहित असल्याचे त्याचे फोटो सोशल मीडियावर धूम उडवून देत आहेत. वास्तविक सुरुवातीलाच ही बातमी समोर आली होती की, पुनीश विवाहित आहे. परंतु आता त्याचा पुरावाच समोर आल्याने तो विवाहित असल्याचे जवळपास सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर पुनीशचा खरा चेहरा समोर आल्याची भावना आता प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीने बंदगी पुनीशसोबत रोमान्स करीत आहे, त्यावरून ती खरोखरच त्याच्या प्रेमात पडली असावी, असेच दिसत आहे. मात्र जेव्हा पुनीश विवाहित असल्याचे तिला समजणार तेव्हा मात्र तिला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात हे दोघेही नॉमिनेटेड झाले असून, ही जोडी फुटणार का कायम राहणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने घरात दोघांविरोधात वातावरण निर्माण झाले आहे, त्यावरून ही जोडी किती काळ घरात राहणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, पुनीश दिल्लीचा रहिवासी असून, एका कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे. पुनीशला पार्ट्यांमध्ये जाणे पसंत असून, तो बार आणि पबमध्ये पैशांची अधिक उधळण करतो.