हा पाहा परदेस में है मेरा दिल फेम अर्जुन बिजलानीचा ड्युप्लिकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 16:52 IST
परदेस में है मेरा दिल या मालिकेत राघवची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन बिजलानी चा ड्युप्लिकेट मिळाला आहे असे तुम्हाला सांगितले ...
हा पाहा परदेस में है मेरा दिल फेम अर्जुन बिजलानीचा ड्युप्लिकेट
परदेस में है मेरा दिल या मालिकेत राघवची भूमिका साकारणाऱ्या अर्जुन बिजलानीचा ड्युप्लिकेट मिळाला आहे असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का? अर्जुनचा ड्युप्लिकेट मिळाला असून तो दुसरा कोणीही नसून त्याचा मुलगा आहे. अर्जुनला एक मुलगा असून तो दीड वर्षांचा आहे. तो त्याचा मुलगा अयानला लकी चार्म मानतो. त्याच्या चित्रीकरणाच्यावेळीदेखील अर्जुनचा मुलगा अयान अनेकवेळा सेटवर त्याला भेटायला येतो. एवढेच नव्हे तर झलक दिखला जा या कार्यक्रमात अर्जुनसोबत अयानने परफॉर्मन्सदेखील दिला होता. झलक दिखला जा या कार्यक्रमात अर्जुनने भाग घेतला होता. त्यावेळी एका भागात फॅमिली वीक साजरा करण्यात आला होता. त्यामुळे स्पर्धक आपले परफॉर्मन्स आपल्या कुटुंबियांना समर्पित करू शकणार होते किंवा ते आपल्या घरातील सदस्यांसोबत नृत्य सादर करू शकणार होते. त्यावेळी अर्जुनने बजरंगी भाईजान या चित्रपटातील तू जो मिला या गाण्यावर अयानसोबत नृत्य सादर केले होते. सगळ्यांना अर्जुनचा आणि छोट्याशा अयानचा परफॉर्मन्स खूप आवडला होता. अर्जुन परदेस में है मेरा दिल या मालिकेत प्रमुख भूमिकेत असल्याने त्याला दिवसाचे कित्येक तास चित्रीकरणासाठी द्यावे लागतात. पण तरीही तो कितीही चित्रीकरणात व्यग्र असला तरी तो अयानसाठी वेळ काढतो. नुकताच अयानचा वाढदिवस झाला. तो अर्जुनने त्याची पत्नी नेहा आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत साजरा केला. तसेच अर्जुनने अयानच्या वाढदिवसाचे निमित्त साधून इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर अयानचे आणि अर्जुनचे लहानपणीचे फोटो अपलोड केले होते. अर्जुनचे हे लहानपणीचे फोटो पाहाता अयान हा अगदी अर्जुनसारखाच दिसतो असेच म्हणावे लागेल. त्यामुळे अयानच्या रूपाने अर्जुनचा ड्युप्लिकेट मिळालेला आहे.