केदारनाथ हे उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात हिमालय पर्वतरांगांमध्ये, मंदाकिनी नदीच्या काठावर वसलेले भगवान शिवाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. श्रीमंत असो किंवा मध्यमवर्गीय कित्येकांना जिथे जाण्याची इच्छा असते. महादेवाचे कित्येक भक्त तिथे दरवर्षी दर्शनाला जात असतात. केदारनाथचा डोंगर चढून जेव्हा महादेवाचं दर्शन घेतो, तेव्हाच सुख हे शब्दात सांगता येत नाही. नुकतंच मराठमोळी अभिनेत्री विदिशा म्हसकर थेट केदारनाथला पोहोचली आहे.
विदिशा म्हसकरनं केदारनाथ यात्रेचा तिचा अनुभव शेअर केला आहे. तसेच तिथले काही फोटो आणि व्हिडीओदेखील तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. विदिशा म्हणते, "आता पहाटेचे चार वाजले आहेत आणि मी नुकताच हा ट्रेक सुरू केला आहे. यासाठी मी मध्यरात्री दोन वाजता उठले. मनात खूप उत्सुकता आहे".
केदारनाथ यात्रेत पायी चालणाऱ्या भाविकांना घोड्यांवरून जाणाऱ्या प्रवाशांमुळे अनेकदा अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यावर नाराजी व्यक्त करत विदिशा म्हणाली, "हा घोड्यांचा ट्रेक आहे की माणसांचा, हेच समजत नाहीये. हे घोडे आणि त्यांचे मालक मधूनच जातात आणि पायी चालणाऱ्यांना बाजूने जावे लागते. यामुळे प्रवासात खूप त्रास होतोय".
विदिशाचा पहाटे ४ वाजल्यापासून सुरू झालेला हा प्रवास दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरूच होता. अडीच वाजले तरी विदिशा मंदिरापासून २ किलोमीटर लांब होती. संपूर्ण यात्रा पूर्ण करण्यासाठी तिला जवळपास १२ तास लागले. मात्र, जेव्हा मंदिराचे दर्शन झाले, तेव्हा विदिशाचे डोळे पाणावले. "एवढा प्रवास केल्यावर जेव्हा समोर मंदिर दिसतं, तेव्हा सगळा थकवा क्षणात दूर होतो. अजून काय हवं?" असे म्हणताना ती भावुक झाली.
Web Summary : Actress Vidisha Mhaskar trekked to Kedarnath, starting at 4 AM. Despite challenges with horse traffic, she reached the temple after 12 hours. The sight of the temple made her emotional, washing away all tiredness.
Web Summary : अभिनेत्री विदिशा म्हस्कर ने केदारनाथ की ट्रेकिंग की, जिसकी शुरुआत सुबह 4 बजे हुई। घोड़े के यातायात की चुनौतियों के बावजूद, वह 12 घंटे बाद मंदिर पहुँची। मंदिर के दृश्य ने उन्हें भावुक कर दिया, जिससे सारी थकान दूर हो गई।