Join us
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: असं काय घडलं की उर्फी जावेदचा चढला पारा, पापाराझीची घेतली चांगलीच शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:42 IST

Urfi Javed: ट्रोलर्सना शांतपणे उत्तर देणारी उर्फी जावेद फोटोग्राफर्सवर चिडलेली दिसली.

टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद अनेकदा विचित्र कपडे घालून पापाराझींसमोर पोझ देताना दिसत आहे. सोशल मीडियावर तिला पाहिल्यानंतर तिचे व्हिडिओ व्हायरल होतात. काहीजण तिच्या ड्रेसवर अश्लील कमेंट करतात तर काहींनी तिच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली. काही लोक असेही म्हणतात की केवळ प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी उर्फी अस्ताव्यस्त कपडे घालते आणि फोटो काढण्यासाठी जागोजागी पापाराझींना बोलावते. मात्र यावेळी उर्फीचं वेगळं रूप पाहायला मिळाले. ट्रोलर्सना शांतपणे उत्तर देणारी उर्फी फोटोग्राफर्सवर चिडलेली दिसली.

या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद पापाराझीनं विचारताना दिसते आहे की, शेवटची जेव्हा मी झलकवर आली होती, तेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी कमेंट करत होते की आज मी चांगले कपडे घालून आले आहे.' यानंतर उर्फीने त्या व्यक्तीचा ऑडिओ देखील ऐकवला आणि रागाने विचारले की हा आवाज कोणाचा आहे!'

उर्फी जावेदचा राग इथेच थांबला नाही. ती पुढे म्हणाली की, 'मी यामुळे येत नाही. कृपया. तुम्हाला कपड्यांवर कमेंट करायची असेल तर तुमच्या गर्लफ्रेंड आणि आई-बहिणीच्या घरी जाऊन करा, आजच्या नंतर माझ्या कपड्यांवर कोणी कमेंट करणार नाही. मी तुमचा खूप आदर करते आणि मला तो अशापद्धतीनं मिळत आहे.'

खरेतर, काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने 'झलक दिखला जा १०' या डान्स रिअॅलिटी शोच्या लॉन्च पार्टीला हजेरी लावली होती, जिथे ती निळ्या रंगाच्या चमकदार ड्रेसमध्ये दिसली होती. तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक फोटोग्राफर सांगत होता की, आज ती नीट कपडे घालून आली आहे. आता उर्फीने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.