Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : परतली ‘गोरी मेम’ सौम्या टंडन! ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर धुमधडाक्यात स्वागत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 14:15 IST

‘भाभी जी घर पर है’ फेम टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन चार महिन्यांच्या प्रसूती रजेनंतर कामावर पतरली आहे. सौम्याच्या वापसीमुळे चाहते खूश आहेत. पण ‘भाभी जी घर पर है’चे को-स्टार्सही गोरी मेम परतल्यामुळे जाम आनंदात आहेत.

ठळक मुद्देसौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमुळे ख-या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. 

‘भाभी जी घर पर है’ फेम टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन चार महिन्यांच्या प्रसूती रजेनंतर कामावर पतरली आहे. सौम्याच्या वापसीमुळे चाहते खूश आहेत. पण ‘भाभी जी घर पर है’चे को-स्टार्सही गोरी मेम परतल्यामुळे जाम आनंदात आहेत. त्यामुळेच गोरी मेम सेटवर पोहोचली आणि ‘भाभी जी घर पर है’ च्या संपूर्ण टीमने तिचे धडाक्यात स्वागत केले.सौम्याने सेटवरचा हा ‘वेलकम’ व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  गोरी मेम सेटवर पोहोचल्याच्या आनंदात ‘भाभी जी घर पर है’ची टीम  ‘तुम आए तो आया मुझे याद गली में आज चांद निकला,’ हे गाणे गाताना दिसत आहे.

सौम्याने या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांचे आभारही मानलेत. मी परतण्याचे वचन दिले होते. मी शोमध्ये कधी परतणार, असा प्रश्न मला अनेकांनी केला. त्यामुळेच सेटवर पोहोचून तुम्हाला सरप्राईज देण्याचा विचार मी केला, असे सौम्याने म्हटले.

२०१६ मध्ये सौम्याने बॉयफ्रेन्ड सौरभ देवेंद्र सिंहसोबत लग्न केले होते. लग्नापूर्वी १० वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. यावर्षी २० जानेवारीला सौम्याने मुलाला जन्म दिला.

बाळाच्या जन्मानंतर सौम्याचे वजन वाढले होते. गत चार महिन्यांत सौम्याने वजन कमी केले. प्रसूतीनंतरच्या चारच महिन्यांत ती आपल्या जुन्या शेपमध्ये परतली.

‘भाभी जी घर पर है’मध्ये सौम्या अनिता भाभीची भूमिका साकारते. यातील तिचे ग्लॅमरस लूक लोकांना प्रचंड भावते.सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘जब वी मेट’ या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली. 

टॅग्स :सौम्या टंडनभाभीजी घर पर है