‘जीत गयी तो पिया मोरे’ आणि ‘भूतू’ मालिकांनी गाठला १०० भागांचा टप्पा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 14:52 IST
झी टीव्हीवर अलीकडेच सुरू झालेल्या ‘जीत गयी तो पिया मोरे’ आणि ‘भूतू’ या दोन मालिकांनी नुकताच १०० भागांचा टप्पा ...
‘जीत गयी तो पिया मोरे’ आणि ‘भूतू’ मालिकांनी गाठला १०० भागांचा टप्पा!
झी टीव्हीवर अलीकडेच सुरू झालेल्या ‘जीत गयी तो पिया मोरे’ आणि ‘भूतू’ या दोन मालिकांनी नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला. कथानकाला मिळणाऱ्या कलाटण्या, नाट्यपूर्ण प्रसंग आणि लोकप्रिय जोड्या यामुळे या मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळविली आहे. ‘ब्युटी अॅण्ड द बीस्ट’ या प्रसिद्ध इंग्रजी कथेवर आधारित असलेली ‘जीत गयी तो पिया मोरे’ या मालिकेचे कथानक राजस्थानातील सुजनगढ या छोट्या गावात घडत असून या मालिकेत चौहान आणि राजावत या दोन घराण्यांमधील वैराची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. देवी चौहानचा म्हणजेच येशा रोहानीचा विवाह, अधिराज राजावत म्हणजेच कृप कपूर सुरी याच्याशी जबरदस्तीने करण्यात आलेला आहे. संतापी, निर्दय आणि हिंसक असलेल्या अधिराजला आपल्या प्रेमाने देवी कशाप्रकारे प्रेमळ बनवते, हे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पार पाडला. याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम एका हॉटेलमध्ये गेली होती. तिथे त्यांनी खूप मजा-मस्ती केली. याविषयी अधिराजची भूमिका रंगविणारा अभिनेता कृप कपूर सुरी सांगतो, या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले याचा मला आनंद होत आहे. ही मालिका आणखी रेकॉर्ड लवकरात लवकर करेन अशी मला आशा आहे. या मालिकेचे कुटुंब हे आता एखाद्या कुटुंबासारखे झाले आहे. आम्ही सेटवर खूप सारी धमाल करतो. भविष्यात देखील आम्ही प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करत राहाणार आहोत.लखनऊच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ‘भूतू’ची कथा पिहू नावाच्या एका लहान मुलीची आहे. ही भूमिका आर्शिया मुखर्जी साकारत आहे. आपण मेलेलो आहोत, हे या मुलीला जाणवले नसल्याने ती आपल्या आईच्या शोधात फिरत आहे. पिहू आणि तिच्या आईतील नाते इतके घट्ट आहे की परमेश्वरी ताकदीलाही त्यापुढे झुकावे लागते आणि बालगोपाळच्या म्हणजेच विराज कपूरच्या रूपाने पिहूला एक साथीदार मिळतो. बालगोपाळ सतत पिहूसोबत राहतो आणि तिच्या आईचा शोध घेण्यात तिची मदतही करतो. या शोधादरम्यान ती सुचीला म्हणजेच सना अमीन शेखला भेटते आणि सुचीही तिला मदत करते. या मालिकेचे हे आगळेवेगळे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेचे १०० भाग पूर्ण झाल्याच्या आनंदात या मालिकेच्या टीमने सेटवर मोठाला केक कापला. या मालिकेत सुचीच्या प्रियकराची म्हणजेच आरवची भूमिका रंगविणारा अभिनेता किंशुक महाजन सांगतो, “मालिकेला प्रेक्षकांनी जे प्रेम दिले आहे. त्यासाठी मी प्रेक्षकांचा आभारी आहे. ‘भूतू’ मालिकेची संकल्पना अगदीच चाकोरीबाहेरची असूनही प्रेक्षकांना ती पसंत पडत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. यापुढे देखील प्रेक्षकांना या मालिकेत नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत.