Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकी जैनचं बिग बॉसशी जुनं नातं; 'या' सीझनमध्ये दिसला होता, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 11:59 IST

 'बिग बाॅस 17' मुळे विकी जैन हा चर्चेत असून त्याचा गेम लोकांना आवडताना दिसतोय. 

बिग बॉस’चं 17 वं पर्व दिवसेंदिवस रंगतदार होत चाललं आहे. निर्माते टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसत आहेत.  'बिग बॉस 17' च्या घरात अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झालेली आहे. दोघांच्या जोडीला चाहत्यांची पसंती मिळत आहे. विकीचा मास्टरमाईंड असा उल्लेख चाहते करत आहेत. आता यातच विकी जैनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याचा बिग बॉस शोशी जुना संबंध असल्याचे दिसत आहे.

विकीचा समोर आलेला व्हिडीओ हा सीझन 4 चा आहे. ज्यामध्ये सारा खान आणि अली मर्चंटचे लग्न झाले होते. यावेळी विकी जैनही आला होता. या व्हिडीओमध्ये विकी हा अभिनेता जय भानुशालीसोबत बसलेला दिसत आहे. त्यांच्या मागे बसलेले इतर लोक सारा आणि अलीच्या लग्नाचा आनंद लुटत आहेत. विकी म्हणतो, 'अलीलाही कुणीतरी उचलून घ्या'. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

एका युजरने लिहिले की, विकी बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये आहे. दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'कोणाचे तरी लग्न लावण्यासाठी तो आला होता, आता तो स्वतःचे लग्न मोडणार आहे'.  विकीबद्दल बोलायचे झाल्यास, तो छत्तीसगढचा असून त्याने काही वर्षांपूर्वीच आपला फॅमिली बिझनेस जाॅईन केलाय. अत्यंत लग्झरी लाईफस्टाईल हा विकी जैन जगतो. विकी जैन याची संपत्ती ही 100 कोटींच्या आसपास असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.  'बिग बाॅस 17' मुळे विकी जैन हा चर्चेत असून त्याचा गेम लोकांना आवडताना दिसतोय. 

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटिव्ही कलाकार