Join us
Daily Top 2Weekly Top 5

विभूती नारायण आता बाल्ड लूकमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 12:59 IST

'भाभी जी घर पर है' या मालिकेत अभिनेता आसिफ शेख अर्थात विभूती नारायण बाल्ड लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.मात्र यासाठी ...

'भाभी जी घर पर है' या मालिकेत अभिनेता आसिफ शेख अर्थात विभूती नारायण बाल्ड लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.मात्र यासाठी आसिफनं टक्कल केलेलं नसून सगळी मेकअपची कमाल असणार आहे. हा अवतार पाहायला मजेशीर वाटत असला तरी तो सांभाळणं तितकंच कठीण असल्याचं आसिफनं सांगितलंय. इतर भूमिकांच्या तुलनेत हा लूक सांभाळणं थोडं आव्हानात्मक असल्याचं त्याला वाटतं. या लूकमुळं श्वास घ्यायलाही कधी कधी त्रास होत असल्याचं त्यानं म्हटलंय. शिवाय इतर भूमिकांच्या तुलनेत या भूमिकेसाठी तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याचंही आसिफनं सांगितलंय.. रसिकांना हा लूक भावेलच असा विश्वास आसिफला आहे.. या मालिकेत आता वस्तरामॅनची एंट्री होणार आहे. हा वस्तरामॅन पुरुषांवर हल्ला करुन त्यांचं टक्कल करतो.. त्याच्या तावडीत विभूती नारायण सापडतो आणि पुढे सगळी धम्माल मस्ती घडते असं मजेशीर कथानक भाभी जी घर पर है मालिकेत पाहायला मिळणार आहे.