Join us

"बेबी, आता तुला त्रास नाही होणार...", अभिनेत्याचं कॅन्सरने निधन, अभिनेत्रीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:33 IST

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं २ जून रोजी कॅन्सरने निधन झालं. त्याच्या निधनानंतर विभूची सहकलाकार आणि निशा और उसके कझन्स फेम अभिनेत्री अनेरी वजानी हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

टीव्ही अभिनेता विभू राघव याचं २ जून रोजी कॅन्सरने निधन झालं. गेल्या ३ वर्षांपासून तो कॅन्सरशी झुंज देत होता. त्याला स्टेज ४ आतड्याचा कॅन्सर होता. अखेर त्याची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. विभूच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. तर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता त्याच्या निधनानंतर विभूची सहकलाकार आणि निशा और उसके कझन्स फेम अभिनेत्री अनेरी वजानी हिने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

अनेरी वजानी हिने विभू राघवसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये ती म्हणते, "आता तुला त्रास होणार नाही, बेबी. विभू तू शेवटी मला सांगितलं होतंस की मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. मला आठवतंय की तू हसतही होता आणि रडतही होता. हॉस्पिटलच्या बेडवर असतानाही मस्ती आणि प्रेम करणं, आणि नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवणं हे फक्त तूच करू शकतोस. मी तुला व्हॉट्स अॅपवर एक मोठा मेसेज लिहून माझ्या ट्रिपसाठी निघून गेले. विचार केलेला की तू घरी आल्यावर तो मेसेज वाचून मला फोन करशील आणि माझ्यावर ओरडशील. मी परत येईपर्यंत थांबलास, त्यासाठी थँक्यू. सगळ्या सुंदर आठवणींसाठी थँक्यू. थँक्यू जेव्हा मला हसायची इच्छा नव्हती तरीदेखील तू हसवलंस त्यासाठी...तुझ्यासारखी व्यक्ती भेटणार नाही". 

"तू शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिलास आणि मला तुझ्यावर गर्व आहे. तुला लवकरच भेटेन. तिकडे माझे आजोबा आणि निशाचे आजोबा यांना भेट. तुम्हाला एकमेकांना बघून आनंद होईल याची मला खात्री आहे. मी तुझ्यावर प्रेम करते विभू पण मला माहितीये तू माझ्यावर जास्त प्रेम करतोस", असंही तिने पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

२०२२ मध्ये विभू राघवला Colon Cancer (आतड्याचा कॅन्सर) कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून तो कॅन्सरवर उपचार घेत होता. त्याचा कॅन्सर शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. कॅन्सरवरील उपचारामुळे त्याच्याकडचे पैसेही संपले होते. त्याच्यावरील उपचारासाठी आणि त्याला मदतीसाठी अनेक कलाकार पुढे आले होते. निशा और उसके कझन्स, सुरवीन गुग्गल यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं होतं. 

टॅग्स :टिव्ही कलाकारकर्करोग