वत्सल बनला चायवाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 15:30 IST
रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेद्वारे वत्सल सेठ सध्या प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. वत्सल प्रेक्षकांसोबतच मालिकेच्या टीमचाही लाडका आहे. वत्सलला ...
वत्सल बनला चायवाला
रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेद्वारे वत्सल सेठ सध्या प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. वत्सल प्रेक्षकांसोबतच मालिकेच्या टीमचाही लाडका आहे. वत्सलला चहा खूप आवडतो आणि त्यातही मसाला चहा म्हणजे त्याचा जीव की प्राण. पण त्याला त्याचा चहा दुसरा कोणी बनवलेला आवडत नाही. त्यामुळे तो सेटवर आले, वेलची टाकलेला स्पेशल चहा स्वतः बनवतो. काही दिवसांपूर्वी वत्सलने मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी त्याचा हा स्पेशल चहा बनवला होता. त्याच्या या चहाची चव सगळ्यांनाच खूप आवडली होती. तेव्हापासून त्याला या मालिकेच्या टीममधील लोक मस्करीने चहावाला अशीच हाक मारू लागले आहेत.