वसुंधरा बनली नोकराणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 13:49 IST
थपकी प्यार की या मालिकेतील वसुंधरा इतरांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. पण तिने केलेल्या वाईट गोष्टी आता ...
वसुंधरा बनली नोकराणी
थपकी प्यार की या मालिकेतील वसुंधरा इतरांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही. पण तिने केलेल्या वाईट गोष्टी आता तिच्याच अंगाशी येणार आहेत. श्रद्धाच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी वसुंधराची खरी बाजू सगळ्यांच्या समोर येणार आहे. या सगळ्यामुळे वसुंधराला घर सोडावे लागणार आहे. पण यानंतर वसुंधराचे वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रद्धाने आता सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याचे ठरवले आहे. वसुंधराला ती नोकराणीसारखी वागवणार असून तिला कपडेही नोकराणीप्रमाणेच घालायला देणार आहे.