Join us

वरूण धवनला खूप भावला 'फील क्य्रू' ग्रुपचा परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 19:40 IST

वरूण धवनने देखील देशात मुलींवर होत असलेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांना आणि त्यामुळे मुलींसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणाला वाचा फोडणाऱ्या 'फील क्य्रू' ग्रुपच्या नाट्याचे व त्यांचे खूप कौतूक केले.

ठळक मुद्दे'फील क्य्रू'चा अॅक्ट अप्रतिम होता - वरूण

समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कला हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'डान्स प्लस 4' कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नुकतेच नेमके हेच घडले. देशात अलीकडेच झालेल्या बलात्काराच्या एका भीषण घटनेकडे या कार्यक्रमाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. सर्व मुलांचा समावेश असलेला 'फील क्य्रू' या स्पर्धक गटाने देशातील मुलींच्या सुरक्षिततेचा स्तर वाढावा, असे आवाहन करणाऱ्या एका हृदयस्पर्शी गीत नाट्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. या त्यांच्या अॅक्टचे सिनेक्षेत्रात खूप कौतूक होत आहे. नुकतेच अभिनेता वरूण धवनने देखील या मुलांच्या देशात मुलींवर होत असलेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांना आणि त्यामुळे मुलींसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणाला वाचा फोडणाऱ्या नाट्याचे व त्यांचे खूप कौतूक केले.

वरूण धवन म्हणाला की, मी 'फील क्य्रू' या स्पर्धक गटाचा परफॉर्मन्स पाहिला. त्यांनी देशात महिलांवरील अत्याचार व असुरक्षित वातावरणांचे प्रखर चित्रण त्यांच्या परफॉर्मन्समधून केले आहे. खूप अप्रतिम अॅक्ट होता. प्रत्येक वेळी आपण बोलतो की, मुली वाचवा आणि मुलींवर खूप बंधने लादतो. मात्र आपण मुलांना महिलांचा आदर करा व त्यांचे रक्षण करा असे सांगायला विसरतो. जगात दोघेही समान आहेत. मी ‘फील क्य्रू’चे अभिनंदन करतो. त्यांचा हा अॅक्ट मला खूप भावला. बेस्ट ऑफ लक टीम पुनित.'फील क्य्रू' या स्पर्धकांनी देशात मुलींवर होत असलेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांना आणि त्यामुळे मुलींसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणाला वाचा फोडणाऱ्या नाट्याने उपस्थितांना हेलावून सोडले. त्यांची ही कामगिरी इतकी भारावून टाकणारी होती की कार्यक्रमाचे परीक्षक तसेच सुपरजज रेमो डिसुझा हे काही काळ अवाक झाले. अभिनेत्री मौनी रॉय आणि गीता कपूर यांनी हा परफॉर्मन्स झाल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. परीक्षक पुनित पाठक याने आपल्या सोशल मीडियाच्या हॅण्डलद्वारे या दोघींच्या प्रतिक्रिया अनेकांपर्यंत पोहोचविल्या. 

टॅग्स :वरूण धवनडान्स प्लस 4