Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरूण धवन आता आलिया भट्टवर नाही, तर नीती मोहनवर आहे लट्टु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 13:02 IST

नीती मोहन 'व्हाईस ऑफ इंडिया' सिझन 2 या रिअॅलिटी शोमुळे सध्या नीती मोहन घराघरांत पोहचली आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीवर ...

नीती मोहन 'व्हाईस ऑफ इंडिया' सिझन 2 या रिअॅलिटी शोमुळे सध्या नीती मोहन घराघरांत पोहचली आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा होतात. तिच्या गाण्यांचे तर रसिकही दिवाने होतात. तिचे हसणे,बोलणे, तिचे सौंदर्य या सगळ्या गोष्टी रसिकांना आवडत असल्यामुळे व्हॉईस ऑफ इंडिया म्हटले की,सगळ्यांत आधी नीती मोहनचे नाव घेतले जाते. बद्रीनाथ की दुल्हनिया सिनेमाच्या प्रमोशनसाठी वरूण धवन आणि आलिया भट्ट या दोघांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. ज्याच्यावर सगळ्या तरूणी घायाळ होतात, तोच यावेळी नीती मोहनवर फिदा होताना दिसला.त्याने चक्क नीतीला मंचावर उचलू घेतल्याचे पाहून इतर कलाकार आणि स्पर्धकही आवाक झाल्याचे पाहायला मिळाले.विशेष म्हणजे यावेळी वरूणसह आलिया  भट्टही उपस्थित होते. वरूणचे नीतवर असलेले हे प्रेम पाहून तिलाही आश्चर्य वाटले. सिनेमाच्या प्रमोशन करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावतोय. मात्र कधीच वरूण कोणत्याही कार्यक्रमात इतका रोमँटीक दिसला नाही.मात्र 'व्हाईस ऑफ इंडिया' सिझन 2या मंचावर येताच वरूणला काय झाले हेच कळाले नाही. त्याचा हा रोमँटीक अंदाज मी आजपर्यंत फक्त आणि फक्त सिनेमात पाहिला आहे. यावेळी त्याचा अंदाज निराळाच होता असे खुद्द आलियानेच मीडियाशी बोलताना सांगितले. नीतीला पाहताच वरूण स्वत:ला रोखू शकला नाही. आणि या मंचावर वरूणने नीतसह एक रोमँटीक डान्स परफॉर्मही केला.वरूण इतका नीतीवर लट्टु होत असताना पाहून नीतीही वरूणसारखा बॉयफ्रेंड मिळावा अशी इच्छा तिने बोलुन दाखवली.नीती मोहनबद्दल वरूणला विचारले असता,तो म्हणाली की,नीती उत्तम गायिका तरच आहे.याबरोबर ती उत्तम डान्सही करते.जेव्हा मी तिच्यासह डान्स करायला सुरूवात केली तेव्हापासून मी तिच्या कौशल्यामुळे खूप भारावून गेलो आहे.मुळात नीती आणि मी डान्स करणार आहोत याची आम्हाला कोणीच पूर्व कल्पना दिली नव्हती. ते अगदी अचानक घडले.याविषयी नीती सांगते, वरूणची मी खूप मोठी फॅन आहे.आपल्या फेव्हरेट अभिनेत्याबरोबर डान्स करायला मिळाल्यामुळे मला स्वत:ला एक हिरोईनप्रमाणेच वाटत असल्याचे ती सांगते.'व्हाईस ऑफ इंडिया' सिझन 2ला नीती मोहन,  सलीम मर्चंट,बेनी दयाल आणि शान हे बॉलिवूडचे गायक या शोला जज करत आहेत.