Join us

'अंगुरी भाभी’ला पटवण्यासाठी विभूतीजींचा नवा प्लान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 18:25 IST

छोट्या पडद्यावरील 'भाभी जी घर पर है' या मालिकेत विभूतीजी (आसिफ शेख)‘अंगुरी भाभी’ला पटवण्यासाठी ना-ना त-हाचे फंडे आजमवतात. ...

छोट्या पडद्यावरील 'भाभी जी घर पर है' या मालिकेत विभूतीजी (आसिफ शेख)‘अंगुरी भाभी’ला पटवण्यासाठी ना-ना त-हाचे फंडे आजमवतात. कधी ते सुपरमॅनबनतात तर कधी आणखी काही. आता तर विभूतीजी यांनी अंगुरी भाभीचं मनजिंकण्यासाठी नवा प्लान तयार केलाय. आगामी भागात विभूतीजी आरजे बनल्याचंपाहायला मिळेल. या मालिकेतील सगळे नागरिक एका आगामी रेडिओ शोची आतुरतेनंवाट पाहत असतात. या शोचं त्यांना जणू काही वेडच लागलं. विभूतीजी यांनासमजतं की या रेडिओ शोचा होस्ट सक्सेना (सानंद शर्मा) आहे. त्यामुळंअंगुरी भाभीला इंम्प्रेस करण्यासाठी विभूतीजी सक्सेनाकडे एक शो होस्टकरण्याची मागणी करतात. मात्र ती मागणी सक्सेना धुडकावून लावतो. मात्रएवढ्यातच हार मानतील ते विभूतीजी नाही. त्यांच्याकडे आरजे बनण्याचे नवनवेफंडे आहेत.हेच फंडे आगामी काळात रसिकांचं मनोरंजन करतील आणि हसवून हसवूनवेड लावतील.