Join us

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुसाठी Velentain day ठरणार खास, मिळणार हे सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 06:30 IST

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या प्रकारामुळे सिध्दार्थ खूप हताश आहे. 

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे सुखाच्या सरींनी हे मन बावरे मध्ये अनु - सिद्धार्थची केमिस्ट्री पुन्हाएकदा कधी बघायला मिळणार. अनु–सिद्धार्थच्या नात्यातील वैशिष्ट्य म्हणजे त्यांच निस्वार्थी नात.  बर्‍याच दिवसानंतर व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांच्या ह्याचं नात्यातले अतिशय सुंदररित्या टिपलेले काही सोनरी क्षण प्रेक्षकांना मालिकेमध्ये बघायला मिळणार आहेत. 

गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या प्रकारामुळे सिध्दार्थ खूप हताश आहे. अनुला तो ही खंत व्यक्त देखील करून दाखवणार आहे. सिध्दार्थला कुठेतरी वाटते आहे की व्हॅलेंटाईन डे हवा तसा नाही साजरा करू शकत. यावर अनु सिध्दार्थला दिलासा देते. सुख पैशाने नाही विकत घेता येत, आपण मोजक्या पैशात हा दिवस साजरा करुयात. अनु  - सिध्दार्थ बसमधून फिरताना दिसणार आहे. विशेष म्हणजे मालिकेमध्ये सिध्दार्थ पहिल्यांदाच बसमधून प्रवास करताना दिसणार आहे. सिध्दार्थने या खास दिवशी अनुने गिफ्ट केलेला शर्ट घालणार आहे. हा दिवस सिध्दार्थ अनुसाठी खरोखरच खास बनवणार यात शंका नाही.  हे शूट करत असताना टीव्हीवरील लोकप्रिय जोडीने बसमधून तर प्रवास केलाच पण यादरम्यान बरीच मज्जा मस्ती देखील केली आहे.

टॅग्स :कलर्स मराठी