Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या पहिल्या बर्थ डेला श्वेता तिवारीने घेतले वैष्णोदेवीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:13 IST

श्वेता तिवारीने मुलाच्या वाढदिवसाचे आणि वैष्णोदेवी ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये दोन्ही मुलांसह ती एंजॉय करताना ...

श्वेता तिवारीने मुलाच्या वाढदिवसाचे आणि वैष्णोदेवी ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये दोन्ही मुलांसह ती एंजॉय करताना दिसत आहे. 27 नोव्हेबर 2016 ला मुलगा रेयांशला श्वेताने जन्म दिला होता. आता रेयांशहा 1 वर्षाचा झाला आहे. मुलाचा पहिला बर्थ डे वैष्णोदेवीच्या दर्मन घेण्याची श्वेताची इच्छा होती.त्यानुसार कुटुंबासह श्वेताने वैष्णोदेवी मातेचे दर्शन घेतले. शेअर केलेल्या फोटोत रेयांशसह मुलगी पलक ही दिसत आहे. पलक ही आता 17 वर्षाची झाली आहे. शेअर केलेल्या फोटोत पलकही आपल्या लहान भावाची काळजी घेताना दिसत आहे.काही दिवसांपूर्वीच मम्मी श्वेता तिवारीने मुलगी पलकचे काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पलक तिचा नऊ महिन्यांचा भाऊ रेयांशची काळजी घेताना दिसली होती.फोटोवरून पलक तिच्या भावावर प्रचंड प्रेम करत असून, मम्मी श्वेताप्रमाणेच ती भावाची काळजी घेत असल्याचे पाहाला मिळाले होते. वास्तविक पलक सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असून, तिच्या फॅन फॉलोइंगची संख्या प्रचंड आहे. पलक राजा चौधरी आणि श्वेता तिवारीची मुलगी आहे. राजासोबत घटस्फोट घेतल्यानंतर श्वेताने अभिनव कोहली याच्याशी विवाह केला. रेयांश श्वेता-अभिनवचा मुलगा आहे. शिवाय पलकही श्वेताकडेच राहात आहे.पलक गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.कारण इतर स्टारकिड्सप्रमाणे पलकही लवकरच सिनेमात एंट्री करणार असल्याच्या चर्चा होत होत्या.त्यानुसार  सनी पाजीच्या मुलाची हिरोईन म्हणून ती रूपेरी पडद्यावर एंट्री मारणार असल्याचे बोलले जात होते. खास मुलाच्या सिनेमासाठी हिरोईनच्या शोधात असणारे डॅडी सनी देओलने तब्बल २०० मुलींचे ऑडिशनही घेतल्याचे बोलले जात होते.परंतु त्यातील एकही मुलगी सनीला करणची हिरोईन म्हणून पसंत आली नव्हती. त्यानुसार तिला ऑडीशनसाठी बोलावण्यात आले होते.मात्र  पलकने ही ऑफर नाकारल्याचे समोर आले होते.