Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वचन दिले तू मला' मालिकेत वैभव मांगलेंची एन्ट्री, पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 13:34 IST

स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत दिसणार आहेत.

नाटक असो, सिनेमा असो, मालिका असो किंवा वेबसीरिज. या चारही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे वैभव मांगले. विविधरंगी भूमिकांमध्ये त्यांना आतापर्यंत आपण पहात आलोय. स्टार प्रवाहच्या 'वचन दिले तू मला' मालिकेत ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या भूमिकेत दिसणार आहेत. वैभव मांगले मुळचे कोकणातले त्यामुळे कोकणी, मालवणी आणि वऱ्हाडी या तिन्ही बोलीभाषा अगदी सफाईने बोलतात. जगन्नाथ गुडपल्लीवार हे पात्र बेळगावी असल्यामुळे या पात्राच्या निमित्ताने बेळगावी भाषेचा गोडवाही ते अनुभवणार आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ गुडपल्लीवार या पात्राविषयी सांगताना वैभव मांगले म्हणाले, "अतिशय वेगळं पात्र आहे. खूप इमानदार आहे असं त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. पण जेव्हा खरोखर अन्याय होतो तेव्हा पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यायची त्याची तयारी असते. गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल करून घेणं ही त्याची विशेष हातोटी. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि सिस्टीम कोळून प्यायलेला जगन्नाथ गुडपल्लीवार साकारताना खरंच वेगळा अनुभव मिळत आहे. प्रेक्षकांना हे पात्र आवडेल याची खात्री आहे."

'वचन दिले तू मला' मालिकेत वैभव मांगले आल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. वैभव मांंगले आपल्या विनोदांनी हसवणार की कडक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Mangle enters 'Vachan Dile Tu Mala' as police inspector.

Web Summary : Vaibhav Mangle joins 'Vachan Dile Tu Mala' as Senior Police Inspector Jagannath Gudapalliwar. Known for diverse roles, Mangle will portray a shrewd, system-savvy officer who ensures justice for victims, utilizing his unique crime-solving skills and linguistic abilities. His character will bring an exciting twist to the show.
टॅग्स :वैभव मांगलेमराठी अभिनेतास्टार प्रवाह