Join us
Daily Top 2Weekly Top 5

पतीला सोडून 'मिस्ट्री मॅन'च्या प्रेमात पडली वडापाव गर्ल?; सीक्रेट नात्याचा लवकरच होणार खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 09:41 IST

चंद्रिका दीक्षितने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती माध्यमात येणाऱ्या बातम्यांमुळे त्रस्त दिसत आहे.

नवी दिल्ली - वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यातील वादामुळे चर्चेत आहे. तिचे पती युगम गेरासोबत झालेले भांडण सार्वजनिक झालं आहे. त्यातच चंद्रिका एका मिस्ट्री मॅनसोबत व्हिडिओ बनवताना दिसली आहे. या दोघांना एकसाथ व्हिडिओत पाहून त्यांच्या नात्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेत. हा व्यक्ती कोण, त्याची ओळख काय ते लवकरच समोर येणार आहे.

कोण आहे चंद्रिकासोबत दिसणारा 'तो' व्यक्ती?

चंद्रिका दीक्षितने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात ती माध्यमात येणाऱ्या बातम्यांमुळे त्रस्त दिसत आहे. ती नाराज होऊन मिस्ट्री मॅनला सांगते, तुला माहितीये हे मीडियावाले तुला काय नाव देतायेत? आपल्याविषयी काय काय छापले जातंय असं ती म्हणते, त्यावर मिस्ट्री मॅन सबको जवाब देंगे असं म्हणतो, त्यावर वडापाव गर्ल कधी देणार हे विचारते. त्यावर ८ तारखेला सर्व काही उत्तरे देऊ, त्यादिवशी सर्वांना कळेल असं सांगताना व्हिडिओत दिसतो.

वडापाव गर्लचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ८ फेब्रुवारीला असं काय आहे, जे चंद्रिका आणि तिच्यासोबत दिसणारा व्यक्ती खुलासा करणार आहे असं लोक प्रतिक्रिया देत आहेत. एकाने हे दोघेही ड्रामा करतायेत असं म्हटलं. काही युजर्सने चंद्रिका एखादा प्रोजेक्ट जाहीर करणार आहे असं सांगितले. काहींनी पतीसोबत चाललेला वादही एक नाटक असल्याचे म्हटले. त्यामुळे ८ तारखेला काय होतंय ते पाहा असं युजर्स एकमेकांना सांगत आहेत.

सर्वात रंजक बाब म्हणजे चंद्रिकाने कोण आहे मिस्ट्री मॅन या नावाने अकाऊंटही उघडले आहे. त्यात या व्यक्तीसोबत तिने व्हिडिओ, फोटो शेअर केलेत. एका फोटोत मिस्ट्री मॅनच्या मिठीत चंद्रिका दिसते. या अकाऊंटला केवळ चंद्रिकाच फॉलो करतेय. एक व्हिडिओही पोस्ट केलाय ज्यात वडापाव गर्ल सिंदूर लावून सजलेली दिसते. मिस्ट्री मॅनसोबत तिची जवळीक पाहायला मिळते. हे दोघेही खूप आनंदात आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना चंद्रिका दुसरं लग्न करणार की काय असंही विचारले जात आहे. 

पतीवर केला होता गंभीर आरोप

नुकतेच चंद्रिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ती प्रचंड रडताना दिसते. व्हिडीओमध्ये ती म्हणत होती की, "तुला जगाला काय दाखवायचं आहे? गेल्या दोन महिन्यांपासून मी काय सहन करतेय हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मी काम करते, मुलाला सांभाळते, दुकान बघते आणि तू हे सगळं करतोस?" इतकंच नाही तर, चंद्रिकाने पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबतचे चॅट्स लीक केले असून तिचा फोटोही शेअर केले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vadapav Girl Leaves Husband? Mystery Man Romance to Be Revealed

Web Summary : Chandrika Dixit, the Vadapav Girl, is in the news due to marital issues and a new man. She's hinted at revealing his identity and the nature of their relationship on February 8th, sparking speculation about a publicity stunt or new project.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया